Rajasthan Politics : सचिन पायलट होणार PCC प्रमुख, गेहलोतांकडे राज्याचं नेतृत्व; काँग्रसने शोधला मधला मार्ग!

Sachin Pilot News : आगामी निवडणुकांसाठी पायलट- गेहलोत जोडीने काम करणार?
Ashok Gehlot : Sachin Pilot News :
Ashok Gehlot : Sachin Pilot News :Sarkarnama

Rajasthan News : राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajasthan Congress) सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाबाबत आता पक्षश्रेष्ठी सतर्क झाल्याचे दिसत आहे. राज्यविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत CM Ashok Gehlot) यांच्यात सामंजस्याचा मार्ग शोधत, मध्यस्थी करणार असल्याचे दिसत आहे. पक्षाने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. गेहलोत काँग्रेस नेतृत्वाच्या नव्या योजनेवर फारसे खूश नसल्याचा बोलले जात आहे.

Ashok Gehlot : Sachin Pilot News :
New Parliament : मोठी बातमी! नवीन संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदीच करणार; सर्वोच्च न्यायालयाने 'ती' याचिका फेटाळली

माध्यमातील बातम्यानुसार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्याची ऑफर दिली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेहलोत यांचे म्हणणे आहे की, "भाजपने नुकतेच जाट नेते सतीश पुनिया यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवले आहे. अशा स्थितीत काँग्रेसनेही दोतासरा काढला तर जाट समाजाच्या भाजपविरोधातील नाराजीचा फायदा उठवता येणार नाही. काँग्रेसशासित राजस्थानमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत."

Ashok Gehlot : Sachin Pilot News :
ED and Congress : राज्यातील काँग्रेसचा एकमेव खासदारही ईडीच्या रडारवर ? नेमकं काय घडलं ?

गेहलोत यांना फ्रि हँड : पायलटनेही मान्य केले! :

पक्षाने जाट उपमुख्यमंत्री निवडण्यासाठी गेहलोत यांना मोकळा हात दिला आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय दोतासरा या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. इकडे पायलट यांनी विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष होण्यासही होकार दिल्याचे वृत्त आहे.

कर्नाटकातूनचा धडा :

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता पायलट आणि गेहलोत यांच्यात तात्काळ समेट घडवून आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांसारख्या दोन बड्या नेत्यांना एकत्र आणून काँग्रेसचा विजय झाल्याचे पक्षाच्या नेत्यांना वाटते. या पार्श्‍वभूमीवर राजस्थानातही दोन्ही नेत्यांमधील वाद संपवणे महत्त्वाचे आहे.

Ashok Gehlot : Sachin Pilot News :
Satyendra Jain Bail Granted: आप'चे नेते सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर;पण न्यायालयाने घातल्या 'या' अटी

राजस्थानमध्ये दोन्ही नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. यासोबतच दोघांमध्ये समेटाची तयारीही पूर्ण झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लवकरच सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांची भेट घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखालील जुन्या सरकारच्या विरोधात चौकशी करण्यासाठी लवकरच एक समितीही स्थापन केली जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com