Ed Enquire about MP Dhanorkar Relative : महाविकास आघाडीतील नेत्यांवर 'ईडी', 'सीबीआय'ची कारवाई होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांना तुरुंगवास भोगावा लागला. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह कुटुंबीयांची चौकशी झाली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही 'ईडी'ने नऊ तास चौकशी केली. आता 'ईडी'च्या राडारवर काँग्रेसचे नेते आले आहेत.
महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांवर 'ईडी'ची कारवाई होत असल्याने विरोधकांकडून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली जात आहे. आता महाविकास आघाडीतील काँग्रेसचेही नेत्याच्या नातेवाईकलाही 'ईडी'ने चौकशीची नोटीस दिली आहे. काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या मेहुण्याबाबत 'ईडी'ने चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. काकडे यांच्याविरोधात असलेल्या गुन्हांबाबतही 'ईडी'कडून पोलिसांकडे विचारणा झालेली आहे.
'ईडी'च्या नागपूर (Nagpur ED) कार्यालयाकडून चंद्रपूर पोलिसांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात त्यांनी प्रवीण काकडे यांच्याविरोधात असलेल्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली आहे. काकडे यांच्या चौकशीसाठी येणाऱ्या 'ईडी' पथकाला सहकार्य करण्याची विनंतही पोलिसांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्रामुळे काँग्रेसचे राज्यातील खासदार बाळू धानोरकर यांच्या मेहुणे प्रवीण काकडे यांची लवकरच 'ईडी'कडून कारवाई होण्याच शक्यता वर्तविली जात आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर (NCP) आता काँग्रेसच्या नेतेही 'ईडी'च्या रडारवर आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ व त्यांच्या तीनही मुलांची चौकशी झाली आहे. त्यांच्यावरील सुनावणीचा निकाल बाकी आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्य सरकारसह केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. आता काँग्रेसचे खासदार धानोरकर यांच्या मेहुण्याची माहिती घेण्यास 'ईडी'ने सुरूवात केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.