पळून कुणाबरोबर गेली अन् लग्न कुणाबरोबर! राज ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एके दिवशी पहाटे उठलो तर पाहतो जोडा वेगळाच. पळून कुणाबरोबर गेली अन् लग्न कुणाबरोबर याचा काही मेळच लागेना. राज्यातील जनतेलाही कळेना आपण कुणाला मतदान केलंय. राज्यात तीन नंबरचा पक्ष एक अन् दोन नंबरच्या पक्षांना फिरवतोय. असे कधीही कुठे घडले नसेल, असा जोरदार हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांवर केला.

राज ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊन आपल्या विस्मरणात गेला तशा अनेक गोष्टी तुमच्या विस्मरणात गेल्या आहेत. याचा एक फ्लॅशबॅक पाहूया. दोन वर्षे आपण विसरून गेलो. त्या काळात घडलेल्या घटनाही आपण विसरुन गेलो. २०१९ ची विधानसभा निवडणूक विसरून गेलो. तुम्ही विसरता तेच त्यांच्या फायद्याच ठरतं. मागची विधानसभा निवडणूक आठवा. भाजप- शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी अशी निवडणूक झाली. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खास करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचं सुचलं. तुम्ही आधी कधी बोलला नाहीत. इथे मोदी आले आणि भाषण केलं पण तुम्ही काही बोलला नाहीत. सगळ्यांनी मुख्यमंत्री भाजपचा होईल, हे सांगितलं होतं. त्यावेळी तुम्ही काही बोलला नाहीत. निकाल लागताच अडीच वर्षांची टूम काढली. अमित शहांशी एकांतात बोललो होतो, असं म्हणता तर बाहेर का बोलला नाहीत. मुख्यमंत्रिपदाची गोष्ट चार भिंतीत का केलीत. शहा तर म्हणाले, असं काही बोलणंच झालं नव्हतं.

मग एके दिवशी सकाळी उठलो, पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कुणाबरोबर गेली अन् लग्न कुणाबरोबर काहीच कळेना. राज्यातील जनतेलाही कळेना मतदान कुणाला केलंय. नंतर एक आवाज आला, ये शादी नही हो सकती. लगेच सगळे हिरमसून घरी गेले. पुन्हा शेजारील गॅलरीत कुणीतरी डोळे मारण्यास सुरवात केली. मला घ्या ना कडेवर, असे म्हणू लागले. तीन नंबरचा पक्ष एक व दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. हे फक्त आपल्याकडेच घडताना दिसत आहे. आधी शिव्या घालता अन् नंतर मांडीवर बसता. युती म्हणून तुम्हाला मतदान करणाऱ्या मतदारांशी तुम्ही गद्दारी केली, असा टोला ठाकरेंनी लगावला.

Raj Thackeray
विधानसभा निवडणुकांनंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’

कोरोना (Covid 19) संसर्गाची लाट ओसरल्यानंतर आज दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) मुंबईच्या शिवाजी पार्कवर गुढीपाडवा (Gudi Padwa) मेळावा आज पार पडला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या वेळी मनसैनिकांशी संवाद साधला. मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, तो 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन, असं सूचक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ आज कोणावर धडाडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

Raj Thackeray
मोदी सरकार बॅकफूटवर! आपल्याच खासदाराला संसदेत पाडलं तोंडावर

विशेष म्हणजे, मनसैनिकांनी या मेळाव्याचा एक टीझरही प्रसिद्ध केला होता. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. सभेला संपूर्ण राज्यातून मनसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना केले होते. याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली होती. मात्र, मागील काही काळापासून सुरु असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवर एक चकार शब्दही काढला नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com