Rajasthan Election: राजस्थानमध्ये बंडखोरांनी वाढवली डोकेदुखी; काँग्रेस, भाजपचे 737 बंडोबा उतरले रिंगणात

Rajasthan Vidhansabha Election Insurgency raises : या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपचे 737 बंडोबा रिंगणात उतरले असल्याने विरोधी पक्षासोबतच स्वकीयांचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
congress, bjp
congress, bjpSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan Vidhansabha Election : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस व भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने चुरस वाढली आहे. राजस्थानातील गेल्या निवडणुकीत निकाल पाहता भाजपपुढे बंडखोरानी मोठी डोकेदुखी निर्माण केली आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आलेले बंडखोरानी काँग्रेसला पाठींबा दिला होता. या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपचे 737 बंडोबा रिंगणात उतरले असल्याने विरोधी पक्षासोबतच स्वकीयांचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

2018 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत 830 जणांनी बंडखोरी केली होती. यावेळेस गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बंडखोराची संख्या कमी झाली असली तरी ७३७ जण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

गेल्या निवडणुकीत राजकुमार गौड, महादेव सिंह, बाबूलाल नागर, बालशेती यादव, किशोर लोढा, रमेश खडिया, लक्ष्मण मीना, आलोक बेनीवालानी, रामकिशन मीना यांचा समावेश होता. हे काँग्रेसचे दहा बंडखोर निवडुंन आले होते. त्यांनी विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला होता. दुसरीकडे भाजपचा (BJP) एकही बंडखोर निवडणुकीत विजयी झाला नव्हता.

यावेळेसचे चित्र काहीसे वेगळे असून काँग्रेस (Congress) व भाजप या दोन्ही पक्षात बंडखोरीची लागण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येत्या काळात या बंडोबांमुळे कोणाचा पराभव होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बंडखोराच्या हातात सरकारचे भवितव्य

राजस्थान विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याने सर्वांचे या कडे लक्ष लागले आहे. या बंडखोरांमुळे ऐनवेळी जर भाजप किंवा काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी काही जागा कमी पडल्यास यांच्या मदतीने सरकार स्थापन करता येणार आहे. त्यामुळे येत्या काळात सत्तेच्या चाव्या बंडखोराच्या हातात राहणार आहेत. त्यामुळे या बंडखोराच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sachin Waghmare)

congress, bjp
Ashok Gehlot Vs Sachin Pilot : विधानसभा निवडणुकीआधी राजस्थानमध्ये काँग्रेसमध्ये मोठी घडामोड; गेहलोत- पायलट संघर्षावर...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com