Rajya Sabha by-election : राज्यसभेत I.N.D.I.A आघाडीला फटका बसणार! ; पोटनिवडणुकीत 10 पैकी 9 जागा 'NDA' जिंकणार?

NDA Vs I.N.D.I.A Alliance in Rajya Sabha by-election : जाणून घ्या, राज्यसभेची पोटनिवडणूक कोणत्या दहा राज्यांमध्ये होणार आहे आणि काय आहे या निवडणुकीचं गणित?
NDA Vs  I.N.D.I.A Alliance
NDA Vs I.N.D.I.A Alliance Sarkarnama

Rajya Sabha by-election 2024 : लोकसभा निवडणुकीच रणधुमाळी संपली आहे. निकालानंतर देशात पुन्हा एकदा एनडीए आघाडीचं सरकार आलं आहे. तर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी विरोधात बसली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीतही एनडीए आघाडीलाच यश मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यसभा सचिवालयाच्यावतीने रिक्त झालेल्या दहा जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा केली गेली आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशनही जारी करण्यात आलं असून, सांगण्यात आलं आहे की अशाताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सदस्यांच्या विजयामुळे राज्यसभेतील दहा जागा रिक्त झाल्या आहेत. राज्यसभा पोटनिवडणुकीनंतर सभागृहात भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी मजबूत होणार आहे. तर इंडिया आघाडी आणि काँग्रेसची ताकद घटणार आहे.

NDA Vs  I.N.D.I.A Alliance
Rajya Sabha Election : काँग्रेसनं घेतली 'रिस्क'; लोकसभा जिंकली, पण राज्यसभेची ‘ती’ जागा जाणार?

राज्यसभा पोटनिवडणुकीत सर्व जागा भाजप-एनडीए आघाडीकडे जाणार असल्याचं दिसत आहे. कारण, ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे, तिथे सध्या भाजप-एनीडए आघाडीचे सरकार आहे. यामुळे काँग्रेसला राज्यसभेच्या दोन जागांचं नुकसान होणार आहे. काँग्रेसचे दोन राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल आणि दीपेंद्र हुड्डा यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला आहे. वेणुगोपाल हे राजस्थानमधून राज्सभेचे खासदार आहेत. तर हुड्डा हरियाणामधून राज्यसभेचे खासदार आहेत. आता सध्या राजस्थान आणि हरियाणामध्ये भाजपकडे बहुमत आहे.

NDA Vs  I.N.D.I.A Alliance
Congress : काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेते पद, राज्यसभेत काय गणित?

जेजेपी एनडीए आघाडीपासून विभक्त झाल्याने आणि काही महिन्यानंतरच निवडणूक होणार असल्याने हरियाणामधील पोटनिवडणुकीत खेला होण्याची शक्यता आहे. सध्या हे तरी स्पष्ट नाही की काँग्रेस हरियाणातून राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देईल की नाही. जर असं झालं तर भूपेंद्र हुड्डा आपल्या पसंतीच्या एखाद्या नेत्याला रिंगणात उतरवू शकतात किंवा मग पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी चौधरी बिरेंद्र किंवा किरण चौधरी यांच्यासारख्यांना समर्थन देऊ शकतात.

राज्यसभा पोटनिवडणुकीचं पूर्ण गणित काय? -

राज्यसभेच्या ज्या दहा जागा झाल्या आहेत. त्यामध्ये सात जागांवर भाजपचा ताबा आहे. दोन जागा काँग्रेसकडे आहेत. तर एक जागा आऱजेडीच्या खात्यात आहे. बिहार, महाराष्ट्र आणि आसाम मधून दोन-दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर राजस्थान, त्रिपुरा, हरियाणा आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येक एक जागा रिक्त झाली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसच्या खात्यातील दोन जागांवर विजय मिळणार आहे. काँग्रेसच्या दोन जागा हरियणा आणि राजस्थानमधून आहे, जिथे भाजपचे सध्या सरकार आहे.

अशाचप्रकारे बिहारमध्येही सध्या भाजपचे सरकार आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि आसाम देखील अशी दोन राज्य आहेत, जिथे भाजप मित्रपक्षाच्या साथीने सरकार चालवत आहे. मध्य प्रदेशात भाजपे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. जर त्रिपुराबाबत बोलायचं झालं तर इथेही भाजपचंच सरकार आहे. बिहारमधील दोन जागांपैकी एक जागा एनडीए आणि एक इंडिया आघाडीला मिळू शकते. तरीह भाजपला दहा पैकी नऊ जागा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com