Rajya Sabha Election News : मोठी बातमी! राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या, संपूर्ण वेळापत्रक

Rajya Sabha Polls Announcement : महाराष्ट्र, झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याआधीच निवडणूक आयोगाने जाहीर केली अधिसूचना
Rajya Sabha Election
Rajya Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha Election for Six Seat News : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यापैकी महाराष्ट्रात एनडीए नेतृत्वातील महायुती पुन्हा सत्तेत आली आहे. तर दुसरीकडे झारखंडमध्येही इंडिया आघाडीचे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वामधील सरकार पुन्हा असणार आहे.

मात्र या दोन्ही राज्यांमध्ये अद्याप मुख्यमंत्रिपदाचा शपथिविधी पार पडलेला नाही. असे असताना आता निवडणूक आयोगाकडून(Election Commission) आज(मंगळवार) राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठीच्या निवडणुकीसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, राज्यसभेच्या(Rajya Sabha Election) सहा रिक्त जागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचा निकालही त्याच दिवशी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यसभेचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो, तर लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभा कधीही भंग केली जात नाही, मात्र लोकसभा भंग करता येते.

Rajya Sabha Election
Congress Politics : काँग्रेसची दुर्दशा दाखवणारे महाराष्ट्र ठरले 17 वे राज्य; प्रत्येक निवडणूक ठरतेय घातक...

राज्यसभेच्या ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्यामध्ये आंध्र प्रदेशमधील तीन जागांचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, हरियाणा आणि ओडिशामधील प्रत्येकी एका जागेचाही समावेश आहे. या सर्व सहा जागा विद्यमान खासदारांच्या राजीनाम्यांमुळे रिक्त झाल्या आहेत.

Rajya Sabha Election
Goa Cabinet Reshuffle : ...म्हणून दोन दिवसांत गोवा मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना उधाण !

सद्यस्थितीस राज्यसभेत एकूण 250 जागा आहेत. यामध्ये 238 जागांसाठी अप्रत्यक्षरित्या निवडणूक होईल. तर 12 सदस्यांची निवड राष्ट्रपतींच्या नामनिर्देशनाद्वारे केली जाते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com