Congress Politics : काँग्रेसची दुर्दशा दाखवणारे महाराष्ट्र ठरले 17 वे राज्य; प्रत्येक निवडणूक ठरतेय घातक...

Assembly Elections Maharashtra : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्याने मोठा फटका बसला आहे.
Congress Politics
Congress PoliticsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना सपाटून मार खावा लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 16 जागा मिळाल्या आहेत. पहिल्यांदाच काँग्रेसवर ही नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे राज्यासह राष्ट्रीय पातळीवर पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यावरून भाजपनेही काँग्रेसच्या सुमार कामगिरीवरून निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करून काँग्रेसच्या झालेली दुर्दशा दाखवून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील बहुतेक राज्यांतील जनतेने काँग्रेसच्या भ्रम, खोटेपणा आणि कुटुंबाच्या दुकानाला टाळे लावले आहे. राज्यांत 10 टक्केही आमदार नसलेले महाराष्ट्र 17 वे राज्य ठरले आहे.

Congress Politics
Supreme Court on EVM : महाराष्ट्रात EVM वरून गदारोळ सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, जम्मू-काश्मीर, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, त्रिपुरा अशा अनेक राज्यांमध्ये जनतेने राहुल गांधी आणि काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी उत्तर आणि दक्षिण असा वाद निर्माण करत लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचेही प्रधान यांनी म्हटले आहे.

प्रत्येक भागात जनतेने एकत्रित येत काँग्रेसच्या विभाजनकारी विचारांना चिरडले आहे. काँग्रेस आता स्वत:ला वाचवण्यासाठी देशहिताच्या मुद्द्यांवरही खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. या पक्षाकडे आता कोणतेही धोरण आणि दिशा नाही. काँग्रेस आता केवळ पोकळ आश्वासने आणि कुटुंब वाचवण्यासाठी राजकारण करत आहे. काँग्रेसने विरोधात बसणेच देशाच्या प्रगतीचा मार्ग असल्याचे आता जनतेनेही ठरवले असल्याचा टोला प्रधान यांनी लगावला.

Congress Politics
Rahul Gandhi : मोदींकडून महाराष्ट्रात चॅलेंज, राहुल गांधींनी संविधान दिनी दिल्लीत घेतलं सावरकरांचं नाव

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेनेला ५७ राष्ट्रवादी काँग्रेसला 41, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर अपक्ष व इतर छोट्या पक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com