Rajya Sabha Session : कुलकर्णींचं भाषण, प्रियांका चतुर्वेदींचं स्मितहास्य अन् पटेलांचा संताप; राज्यसभेत महाराष्ट्र गाजला...

Medha Kulkarni, Priyanka Chaturvedi, Praful Patel : राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान मेधा कुलकर्णी यांच्या मदतीसाठी प्रफुल पटेल धावून आले होते.
Medha Kulkarni, Praful Patel, Priyanka Chaturvedi
Medha Kulkarni, Praful Patel, Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : राज्यसभेत गुरूवारी अनोखे चित्र पाहायला मिळाले. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांकडून व्यत्यय आणला जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल त्यांच्या मदतीला धावून गेले.

पटेलांमुळे पीठासीन अधिकारी असलेल्या शिवसेनेच्या (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा उडालेला भडका अन् भाषणादरम्यानचे स्मितहास्य... यामुळं गुरूवारी राज्यसभेत महाराष्ट्र चांगलाच गाजला. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनीही पटेलांसह सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावत त्यात भरच घातली.

मेधा कुलकर्णी यांनी जवळपास 25 मिनिट भाषण केले. यावेळी प्रियांका चतुर्वेदी पीठासीन अधिकारी होत्या. या भाषणादरम्यान कुलकर्णी महाराष्ट्रासाठीच्या विविध योजनांची माहिती देत असताना चतुर्वेदी यांच्या चेहऱ्यावर सातत्याने स्मितहास्य उमटत होते.

Medha Kulkarni, Praful Patel, Priyanka Chaturvedi
Medha Kulkarni Vs Suresh Kalmadi : ...त्यांनी बट्याबोळ केला! राज्यसभेत मेधा कुलकर्णींचा कलमाडींवर घणाघात

पुणे, मुंबई मेट्रोसाठी केलेली तरतूद, वाढवण बंदर, रेल्वेची सुधारलेले स्थिती यावर कुलकर्णी परखडपणे मोदी सरकारची बाजू मांडत होते. त्यावर स्मितहास्य आणि चेहऱ्यावरील हावभावातून चतुर्वेदी यांच्या भावना स्पष्टपणे जाणवत होत्या.

फडणवीसांचं नाव घेताच...

केंद्रात मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर 2014 पासून पुणे शहराचा झालेला बट्याबोळ निस्तरायला सुरूवात झाल्याच्या कुलकर्णी यांच्या विधानावर मात्र त्यांना हसू आवरले नाही. सरकारचे कौतुक चतुर्वेदी यांना पटत नसल्याचे त्यांच्याकडे पाहून स्पष्टपणे जाणवत होते. एकदा नकारार्थी मान हलवत त्यांनी तसे दर्शवूनही दाखवले.

Medha Kulkarni, Praful Patel, Priyanka Chaturvedi
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : देशमुखांनी थेट पेनड्राईव्हच बाहेर काढला; फडणवीसांच्या गर्भित इशाऱ्यानंतर दंड थोपटले

पटेल संतापले

हे सगळं सुरू असतानाच विरोधकांनी भाषणावर आक्षेप घेत थांबवण्याची मागणी केली. खूप वेळ दिल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच चतुर्वेदी यांनीही अर्थसंकल्पावरच बोलण्याची सूचना कुलकर्णी यांना केली. कुलकर्णी यांच्या भाषणात येत असलेला अडथळा पाहून प्रफुल पटेल चांगलेच भडकले. त्यांच्यासह इतर सत्ताधारी सदस्यांचाही आवाज चढला.

नाहीतर बाहेर जा  

पटेल यांना शांत राहण्याची विनंती चतुर्वेदी सातत्याने करत राहिल्या. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पहिल्याच रांगेत बसलेल पटेल उठून उभे राहत विरोधी सदस्यांवर ओरडत होते. त्यामुळे चतुर्वेदीही संतापल्या आहे शांत राहायचे नसेल तर सभागृहातून बाहेर जा, असे पटेलांना सुनावले.

त्यानंतर हळू-हळू गोंधळ कमी झाला अन् कुलकर्णी बोलू लागल्या. पण वेळेअभावी त्यांना भाषण पूर्ण करता आले नाही. त्यांच्यानंतर उभ्या राहिलेल्या रजनी पाटील यांनी केवळ विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कुलकर्णी यांच्यासाठी सत्ताधारी धावून आल्याचा टोला त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com