Shiv Sena Foundation day : शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतयं ; आवाज कुणाचा ? ठाकरे की शिंदे गटाचा..

Thackeray Vs Shinde : यंदा शिवसेनेचे दोन वर्धापनदिन मुंबई साजरे होते आहेत.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama

Mumbai News : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा सोमवारी (ता.१९) वर्धापन दिन साजरा होत आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच दोन ठिकाणी वेगवेगळे वर्धापन दिन (Shivsena Anniversary) साजरे होते आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून यासाठी जोरदार तयारी सुरु आहेत.

खरी शिवसेना कोणाची, भावनिक नाते असलेल्या उद्धव ठाकरे यांची की, एकनाथ शिंदे यांची..हा वाद सुरु असताना यंदा शिवसेनेचे दोन वर्धापनदिन मुंबई साजरे होते आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Ajit Pawar : अजितदादांनी बाण सोडला ; निशाण्यावर कोण ? नेमक काय घडलं..

गेल्यावर्षी जून महिन्यात ठाकरे गट आणि शिंदे गटात शिवसेना विभाजीत झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव, व चिन्ह शिंदे गटाला

दिले आहे. ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे नाव देण्यात आले आहे. शिवसेनेचा (ठाकरे गटाचा) वर्धापन दिन हा मुंबईतील सायन येथे षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे तर शिंदे गटाकडून गोरेगाव येथे नेस्को मैदानावर साजरा होत आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shishir Shinde resign : मनासारखं काम मिळत नसल्याने शिशिर शिंदेंचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' ; वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला..

दोन्ही गटाच्या पक्षनेतृत्वांकडून आपापल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना वर्धापन दिन साजरा करण्याचे आदेश दिले गेले आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे नेते आपापल्या पक्षाचा वर्धापन दिन दणक्यात साजरा करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यासाठीची तयारी अंतिम टप्यात आहे.दोन्हीही गट आम्हीच खरी शिवसेना हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज (18 जून) मुंबई आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतच उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख म्हणून फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत कायदेतज्ज्ञांनी सल्लामसलत सुरु असून लवकरच निश्चित धोरण ठरवले जाणार असल्याचे समजते. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com