नागपूर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी नुकताच राजघराण्याचा इतिहास बदलून टाकला. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांच्या समाधीवर जात डोकं टेकवलं. मागील 160 वर्षात पहिल्यांदाच शिंदे घराण्यातील प्रमुखाने राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यामुळे शिंदे यांच्या या कृतीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावर आता झाशीच्या राणीच्या वंशजांची प्रतिक्रिया आली आहे.
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे सहाव्या पिढीतील वंशज योगेश राव (Yogesh Rao) हे नागपूरमध्ये (Nagpur) एका भाड्याच्या घरात राहतात. शिंदे यांच्या कृतीवर एका हिंदी वृत्तपत्राशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ज्योतिरादित्य यांनी समाधीवर जाऊन दर्शन घेतले, याबाबत आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही राजकारणापासून कोसो दूर आहोत. त्याविषयी फारशी माहितीही ठेवत नाही. शिंदेंच्या मनात याबाबत भावना निर्माण झाली असून म्हणून ते समाधीवर गेले. तो त्यांच्या वैयक्तिक निर्णय आहे.
राव म्हणाले, ऐतिहासिक गोष्टींचे जतन केले जाते. पण राणीचे वंशज असूनही आम्हाला अज्ञातवासात राहावे लागत आहे. लोक आमचा सन्मान करण्यासाठी पुढे येतात. पण सरकारकडून असे प्रयत्न होत नाहीत. झाशीच्या किल्ल्यावर जाण्यासाठीही आम्हाला तिकीट काढावे लागते, अशी खंतही राव यांनी व्यक्त केली. आम्हाला आमची ओळख लपवून काम करावे लागते, असे योगेश राव यांचे वडील व राणीच्या पाचव्या पिढीतील वंशज अरूण राव यांनी सांगितले.
योगेश राव यांच्यासोबत त्यांचे वडील अरूण राव, पत्नी, एक मुलगा व मुलगी राहते. शेजारी राहणाऱ्या लोकांनाही त्यांच्याबाबत फारशी माहिती नसल्याचे हिंदी वृत्तपत्राने म्हटले आहे. अरूण राव हे मध्य प्रदेश इलेक्ट्रिक बोर्डामध्ये इंजिनिअर होते. आता ते निवृत्त झाले आहेत. ते दोन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये राहतात.
दरम्यान, शिंदे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या ग्वाल्हेर येथील समाधीला प्रदक्षिणा घालत नतमस्तक झाले होते. शिंदे यांच्या या कृतीमुळे त्यांच्या राजघराण्याचा इतिहासच बदलू गेल्याचे मानले जात आहे. शिंदे राजघराण्यावर आतापर्यंत राणी लक्ष्मीबाई यांच्याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात आले आहेत. शिंदे राजघराण्याने 1857 मध्ये इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांना मदत केली नव्हती. त्यांनी इंग्रजांना मदत केली होती, असे मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.