Ratan Tata : सर्वात दानशूर व्यक्तीमत्त्व; तरीही एवढी संपत्ती सोडून गेलेत रतन टाटा

Ratan Tata Net Worth : रतन टाटा हे टाटा समूहाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले आहेत. मात्र, टाटा समूहाचा कार्यभार देशभर पसरला आहे.
ratan tata
ratan tatasarkarnama
Published on
Updated on

Ratan Tata News : संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीचा आदर्श निर्माण करणारे प्रसिद्ध उद्योगपती तथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या 86 व्या वर्षी थांबला. रतन टाटा यांना सोमवारी ( 7 ऑक्टोबर ) मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी ( 9 ऑक्टोबर ) त्यांची प्रकृती खालावल्यानं व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, रात्री उशिरा रतन टाटा यांचं निधन झालं. 

रतन टाटा ( Ratan Tata ) यांची गणना यशस्वी उद्योपतींच्या यादीत केली जाते. त्यांच्या नेतृत्त्वाखाली टाटा समूहानं देशातच नव्हे तर संपूर्ण जगात डंका पिटला. रतन टाटा हे 1991 मध्ये टाटा समुहाचे कॅप्टन बनले. 2012 पर्यंत रतन टाटा यांनी कंपनीची कमान सांभाळली.

टाटा समुहाचा व्यवसाय जगभर पसरलेला आहे. स्वयपांक घरातील वस्तूपासून ते विमानपर्यंत, प्रत्येक उद्योगात टाटा समुहानं आपलं बस्तान बसवलं. टाटा समुहामध्ये 100 हून अधिक कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल सुमारे 300 अब्ज डॉलर आहे. तसेच, रतन टाटा हे तब्बल 3 हजार 800 कोटींची संपत्ती सोडून गेले आहेत.

टाटा समुहाच्या जगभरातील व्यवसायांचा विचार करता रतन टाटा यांची संपत्ती कमी वाटू शकते. मात्र, रतन टाटा हे दानशूर व्यक्तीमत्त्व होते. आपल्या उत्पन्नातील मोठा हिस्सा रतन टाटा हे टाटा ट्रस्टला दान करत असत.

ratan tata
Ratan Tata Death : सर्व शासकीय कार्यक्रम रद्द, राज्यात एक दिवसाचा दुखवटा;रतन टाटा यांच्या स्मरणार्थ सरकारचा निर्णय

प्रत्येक संकटात मदत करण्यासाठी रतन टाटा हे अग्रेसर असत. मग, ती 2004 ची त्सुनामी असो किंवा कोरोना महामारीचा उद्रेक असो. कोरोना काळात तर रतन टाटा यांनी 500 कोटींची मदत केली होती. यासह आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना रतन टाटा हे मदत करत. अशा विद्यार्थ्यांना टाटा यांची ट्रस्ट शिष्यवृत्ती देते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com