Delhi News : राज्यातील कोणीही दिल्लीत कामानिमित्त गेला तर त्याचा ओढा महाराष्ट्र सदनकडे असतो. तेथे मुक्कामाला थांबून आपली कामे आटोपून राज्यातील मंडळी परतात. मात्र महाराष्ट्र सदनमधील सुविधांच्या आभावामुळे राज्यातील मंडळींना कायमच गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
या प्रकारावर शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर चांगलेच संतप्त झाले. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच पत्र लिहून तक्रारींचा पाढाच वाचला.
महाराष्ट्र सदनातील सुविधांचा पुरता बोजवारा उडाल्याचा आरोप खासदार वायकरांनी केला आहे. येथील कँटीन, वाय-फाय, गाद्या, तसेच अंघोळीचे पाणी याबाबत तक्रारी असूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याकडेही वायकरांनी Ravindra Waikar लक्ष वेधले आहे. येथील असुविधांमुळे मनस्ताप होत असल्याचेही वायकरांनी अवर्जून सांगितले. पत्रात त्यांनी सदनातील सर्व असुविधांचा उल्लेख करत याकडे लक्ष देण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.
वायकर म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्र शासनाने सुमारे 132 खोल्यांचे महाराष्ट्र सदन उभारले आहे. या सदनाचा खासदारांना अधिवेशन काळात किंवा नागरिकांनाही उपयोग होतो. ही वास्तू चांगली आहे, मात्र या सदनामध्ये अनेक असुविधा आहेत. येथे खासदारांसाठी वेगळा सेल असावा. खासदारांची संख्या पाहता येथील संगणकांची संख्या वाढवावीत. टंकलेखनावर प्रभुत्व असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी अपेक्षाही वायकरांनी व्यक्त केली.
सध्या सदनातील खोल्यांमध्ये नळांद्वारे मिळणारे गरम पाणी बंद आहे. त्यामुळे सदनात वास्तव्यास आसलेल्या खासदार, नागरिकांना नाईलाजाने ऐन पावसाळा आणि हिवाळ्यात थंड पाण्याचे अंघोळ करावी लागत आहे. सदनातील खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना गरम पाणी मिळावे. नळाला शुद्ध पाणी मिळावे. तसेच येथील खोल्यांमधील जुन्या झालेल्या गाद्या, फर्निचर बदलावे, असेही वायकरांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांबाबतही वायकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील खाद्यपदार्थांचे दर ही जास्त आहेत. या पदार्थांचा दर्जाही चांगला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर ठोस निर्णय घ्यावा, असेही वायकरांनी मुख्यमंत्री शिदेंना Eknath Shinde आवर्जून सूचवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.