Karnataka Elections 2023 : भाजपमध्ये खिंडार पडण्यास सुरवात ; तिकीट कापल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

Karnataka Elections 2023 Rebellion BJP After First List : सावदी हे बंडखोरी करु शकतात..अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
Karnataka election 2023
Karnataka election 2023 Sarkarnama

Karnataka Elections 2023 Rebellion BJP After First List : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत नवी अपडेट समोर येत आहे. भाजपने मंगळवारी रात्री उमेदवाराची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर आज (बुधवारी) तिकीट न मिळालेल्यांनी बंडखोरीस सुरवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

"मी भीकेचा कटोरा घेऊन फिरणारा नेता नाही, मी एक स्वाभीमानी नेता आहे. कुणाच्या राजकीय दडपणाखाली काम करणार नाही," अशा शब्दात सावदी यांनी पक्षश्रेष्ठींना सुनावलं आहे. निवडणूक तोंडावर आली असताना सावदी यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा भाजपला मोठा फटका बसणार आहे. सावदी हे बंडखोरी करु शकतात, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Karnataka election 2023
karnataka elections : माजी मुख्यमंत्र्याचे सातव्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंगणार की बंडखोरी करणार ? ; नड्डांच्या भेटीसाठी..

सावदी हे अथानी मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत. २०१८ मध्ये कुमथल्ली मतदार संघात त्यांचा पराभव झाला. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सावदी हे काँग्रेमध्ये सामील होते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.सावदी हे माझ्या संपर्कात नाही, असे शिवकुमार म्हणाले.

Karnataka election 2023
Karnataka Elections 2024 : शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करा, दोन लाख मिळवा ; JDS नेत्याचे अजब विधान ; काय आहे प्रकरण ?

कर्नाटक विधासभेसाठी भाजपने आपली पहिली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या १८९ उमेदवारांच्या यादीत अनेक बड्या नेत्यांचे तिकीट कापले आहे. यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचाही समावेश आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवाडी यांचेही तिकीट कापण्यात आले आहे.

Karnataka election 2023
Karnataka Elections : भाजपकडून ५२ नव्या चेहऱ्यांना संधी ; नऊ डॉक्टर, पाच वकील, दोन सनदी अधिकारी रिंगणात..

जगदीश शेट्टार यांना भाजपने 'निवडणूक लढू नका' असे सांगितले आहे. पण ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी आज (बुधवारी) त्यांना दिल्लीला बोलवलं आहे. शेट्टार हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. दुसऱ्याला संधी देण्यासाठी भाजपने शेट्टार यांचे तिकीट कापले आहे. शेट्टार हे नड्डांना भेटण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहे. अजून ३४ नावांची यादी बाकी आहे.

विद्यमान आमदार महादेवप्पा यादवाद यांचेही तिकीट कापले आहे. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी विरोध प्रदर्शित केला. त्यांच्या जागी भाजपमध्ये नुकतेच आलेले चिक्का रेवना यांना तिकीट देण्यात आले आहे. कर्नाटक भाजपमध्ये अजून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com