Changes In NCERT Book : देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांचा संदर्भ NCERT ने हटवला ..

NCERT Book Political Science : कलम ३७० बाबतचा काही संदर्भ देखील NCERTच्या अभ्यासमंडळाने हटवला आहे.
NCERT Book Political Science
NCERT Book Political Science Sarkarnama

References to Maulana Abul Kalam Azad Removed From Political Science : महात्मा गांधी यांच्याबाबतचा वादग्रस्त संदर्भ वगळल्यानंतर आता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT)देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबतचा संदर्भ वगळला आहे.

NCERTने अकरावीच्या 'राजनीती विज्ञान' या पुस्तकातील मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबाबतचा संदर्भ वगळला आहे. या नवीन पुस्तकात आता 'संविधान - क्यों और कैसे'या पाठात संविधान समितीच्या बैठकीत सहभागी झालेले मौलाना आझाद यांचे नाव हटवलं आहे.

NCERT Book Political Science
Sharad Pawar Reaction: अजितदादा भाजपमध्ये जाणार ? दमानियांच्या टि्वटवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया..म्हणाले..

मौलाना आझाद यांचे संविधान निर्मितीत मोठा सहभाग होता, असे काही अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे एनसीआरटीच्या या बदलामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जम्मू-काश्मीर आणि कलम ३७० बाबतचा काही संदर्भ देखील NCERTच्या अभ्यासमंडळाने हटवला आहे. (Political Breaking News)

काही दिवपापूर्वी महात्मा गांधी, नथुराम गोडसे आणि आरएसएसशी संबंधित काही माहिती NCERTच्या नव्याने छापलेल्या पुस्तकांमधून काढून टाकण्यात आली आहे.

NCERT Book Political Science
Narayan Rane Slams Sanjay Raut : एखादी नोकरी असेल तर राऊतांना द्या ; राणे चिडले ; आदित्य ठाकरे बालिश...

काय काढून टाकले?

#गोडसे पुण्यातील एक ब्राह्मण होते.

#गोडसे हे एका हिंदू वृत्तपत्राचे संपादक होते, ज्याने गांधीजींना 'मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारे'असे वर्णन केले होते.

एनसीईआरटीच्या पुस्तकातून काढून टाकलेली ही सर्व माहिती गेल्या वर्षीच्या योजनेत समाविष्ट करण्यात आली नव्हती. याबाबत एनसीईआरटीकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com