Sharad Pawar News: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल सुप्रीम कोर्टात राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. पण त्याआधीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका टि्वटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी टि्वट करुन दिली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या जवळकीची चर्चा रंगली आहे.
नेमके कोण कोणासोबत?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संपूर्ण शिंदे गट ईडीच्याच भीतीने भाजपसोबत गेला, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेससोबतही हाच प्रयोग सुरू आहे, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे नेमके कोण कोणासोबत? याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
राजकीय वर्तुळात आणखी संभ्रम..
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पत्रकारांनी याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. पवारांना विचारले असता 'मला त्याबाबत काही माहिती नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शरद पवार यांनी हा दावा फेटाळला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणखी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Political News)
काय म्हणल्या होत्या दमानिया..
“आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच… बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची”, अशा आशयाचे ट्वीट दमानिया यांनी केल्याने येत्या काही दिवसांत खरंच असे काही होणार आहे का? यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी देखील दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. “किळसवाणी राजकारण..मी पुन्हा येईन” असे या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले होते.
(Edited By Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.