Renuka Singh : छत्तीसगडला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार? केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांचे नाव आघाडीवर

Chhattisgarh Assembly News : रेणुका सिंह या छत्तीसगडमधील आदिवासी महिला आमदाराचा मोठा चेहरा आहेत.
Renuka singh
Renuka singh Sarkarnama
Published on
Updated on

Vidhnsabha Election : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरात बाजी मारली. काँग्रेसच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला. छत्तीसगडमध्ये भाजपच्या (Bjp) मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जणांमध्ये रस्सीखेच दिसून येते. केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांच्या रूपाने छत्तीसगडमध्ये पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता आहे.

रेणुका सिंह या छत्तीसगडमधील आदिवासी महिला आमदाराचा मोठा चेहरा आहेत. सूरजपूरचे जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलिसेला यांनी संपूर्ण टीमसह रामानुजनगर गाठले. त्यांनी रेणुका सिंह यांच्या निवासस्थान व आसपासच्या परिसराची पाहणी केली. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून रेणुका सिंह यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याने भाजपचे मनोबल उंचावले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री रमण सिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव, विजय बघेल, केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्या छत्तीसगडमधील गतिमान नेत्या मानल्या जातात. नुकतीच त्यांनी भरतपूर सोनहाटमधून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. छत्तीसगडमधील भाजपच्या आमदारांची लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

Renuka singh
Nagpur Winter Session 2023 : विधानसभेत ‘या’ नऊ माजी सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडून कामकाज स्थगित

भाजपच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख

रेणुका सिंह (Renuka Singh) यांनी पंचायत समिती सदस्यपदाच्या निवडणुकीपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1999 मध्ये त्या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2000 साली भाजपने त्यांना रामानुजनगर मंडळाचे अध्यक्ष केले. 2003 मध्ये रेणुका सिंह सुरगुजा विभागातील रामानुजनगर विधानसभेतून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. भाजपच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख आहे.

केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी

रेणुका सिंह 2008 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्या. रेणुका त्यांच्या आमदारकीच्या काळात राज्य मंत्री मंडळात त्या महिला आणि बालविकास राज्यमंत्री होत्या. यासोबतच त्या सुरगुजा विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा होत्या. त्या 2019 मध्ये सुरगुजा लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाल्या. त्यानंतर रेणुका सिंह यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्रीपदी वर्णी लागली.

कौटूंबिक पार्श्वभूमी

रेणुका सिंह यांचा जन्म 5 जानेवारी 1964 रोजी छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील पोडी बाचा गावात झाला. त्यांचा विवाह रामानुजनगर भागातील नरेंद्र सिंहसोबत झाला. रेणुका आणि नरेंद्र यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत.

निवासस्थानच्या सुरक्षेचा घेतला आढावा

मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत रेणुका सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता पाहता मंगळवारी सूरजपूरचे जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण एलिसेला, डीएफओ पंकज कमल आणि जिल्हा पंचायतीच्या सीईओ लीना कोसम यांनी रामानुजनगर गाठून रेणुका परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

समर्थकांकडून पूजाअर्चा सुरू

जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या टीमने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांनी पोलिसांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री होण्यासाठी ठिकठिकाणी पूजाअर्चा सुरू केली आहे.

Renuka singh
BJP News : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचे पुन्हा धक्कातंत्र? दोन-चार दिवसांत मुख्यमंत्र्यांची नावे होणार जाहीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com