बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) भाजपच्या (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच असंतोषाचा स्फोट झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi), माजी मंत्री अंगारा, विश्वनाथ पाटील, आमदार गोळीहट्टी शेखर, आमदार अनिल बेनके, महादेवप्पा यादव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यातील काही नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुसरीकडे, विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने विधान परिषदेचे सदस्य आर. शंकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Resignation of five BJP leaders, including former deputy chief minister, due to not get candidature)
उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा करून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर वरिष्ठांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. नाराज माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपचा राजीनामा देऊन कॉंग्रेस नेत्यांशी संपर्क वाढविला आहे. मंगळूरच्या सुळ्या मतदारसंघातून उमेदवारी गमावलेले मंत्री एस. एस. अंगारा यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आणि माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्या मार्गाचा अवलंब केला.
विश्वनाथ पाटील यांनीही भाजपचा राजीनामा जाहीर केला. होसदुर्गाचे आमदार गोळीहट्टी शेखर यांनी बंडखोरी केली आहे. ते अपक्ष लढणार आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, रामदुर्गचे आमदार महादेवप्पा यादव यांनीही उमेदवारी दिली नाही. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात संजय पाटील इच्छुक होते. परंतु उमेदवारी गमावल्याने तेही नाराज आहेत. बेळगाव उत्तरमधील आमदार ॲड. अनिल बेनके यांना उमेदवारी डावलण्यात आल्याने समर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. चन्नम्मा चौकासह विविध भागात मंगळवारी, बुधवारी असे २ दिवस आंदोलन झाले.
भाजपने १८९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यापैकी नऊ विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळालेली नाही. काँग्रेस आणि धजदने भाजपमध्ये उमेदवारी गमावलेल्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आहे. बंडखोरांचा असंतोष दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. खुद्द मुख्यमंत्री बोम्मई यांनी विद्यमान आमदार आणि उमेदवारी गमावलेल्या काही नेत्यांशी संपर्क साधला आहे. त्यांनी बंडखोरांना स्पर्धा न करता सहकार्य करण्याचे आवाहन केले.
नाराज आमदाराचा तातडीने राजीनामा
उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले विधान परिषदेचे सदस्य आर. शंकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. राणेबेन्नूरची उमेदवारी आर. शंकर यांच्याऐवजी विद्यमान आमदार अरुणकुमार यांना मिळाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आर. शंकर यांनी अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.