Nitin Deshmukh In Trouble: शिंदे फडणवीसांना भिडणारा ठाकरे गटाचा फायर ब्रँड नेता अडचणीत; कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल, 'हे' आहे कारण

Mla Nitin Deshmukh Vs Devendra Fadnavis: गुन्हा दाखल झाल्यानंतरही...
Nitin Deshmukh News
Nitin Deshmukh NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola News: शिंदे फडणवीसांना भिडणारा आणि ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे नेते व आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अकोला ते नागपूर अशी पदयात्रा घेऊन निघालेल्या आमदार देशमुख आणि या पदयात्रेतील अन्य १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

मतदारसंघातील पाणी प्रश्नावरुन आमदार नितीन देशमुखां(Nitin Deshmukh)ची अकोला ते नागपूर पदयात्रा 10 एप्रिलपासून सुरु झाली आहे. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरापासून ही यात्रा सुरु झाली असून ती अमरावती जिल्ह्यात दाखल झाली आहे.मात्र,या पदयात्रेसाठी देशमुखांनी प्रशासनाची परवानगी मागितली नव्हती. तसेच जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश धुडकावल्या प्रकरणी आमदार देशमुख यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nitin Deshmukh News
Satara Politics: ...तर तुम्ही शोलेतील गब्बर सिंग! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा आमदार शिंदेंवर पलटवार

आमदार नितीन देशमुख, ठाकरे-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा आदींसह जवळपास १०० ते १२५ जणांवर जिल्हाधिकाऱ्यांचे अकोला जिल्ह्यातील जमावबंदीचे आदेश झुगारल्याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पदयात्रेची आगेकुच सुरूच आहे. बुधवारी ही पदयात्रा अमरावतीत दाखल झाली आहे.

...ही पदयात्रा फडणवीसांच्या निवासस्थानी धडकणार!

आमदार नितीन देशमुख यांनी ६९ खेड्यांचा पाणीप्रश्न घेऊन ही पदयात्रा सुरु केली आहे. अकोला, अमरावती आणि त्यानंतर नागपुरात ही पदयात्रा जात आहे. १० एप्रिलपासून यात्रेला सुरुवात झाली. आज ही अमरावती जिल्ह्यात पोहोचली आहे. २१ एप्रिल रोजी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहे. ६९ गावांतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारं पाणी प्यावं लागतंय. या पाण्यात क्षाराचं प्रमाण अति असल्याने अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय असा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे.

Nitin Deshmukh News
Eknath Shinde News : वज्रमूठ सभेला जाताना भीषण अपघात; ठाकरे गटाच्या जखमी कार्यकर्त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री आले धावून

...तेव्हा त्यांना काय वेदना होत असतील!

६९ गावांतील नागरिकांच्या पाणी प्रश्नांवरुन आमदार देशमुख यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी अगदी लहान बाळालाही हेच पाणी पाजावं लागतंय. ३ महिन्याच्या बाळाला हे पाणी इथल्या महिला पाजतात, तेव्हा त्यांना काय वेदना होत असतील असा भावनिक सवालही विचारला आहे. महिला आणि येथील नागरिकांचा हाच प्रश्न घेऊन नितीन देशमुख यांनी या गावांतील पाणी एका टँकरमध्ये जमा करून फडणवीसांच्या निवासस्थानी जाण्याचं आंदोलन सुरु केलंय. (Latest Vidarbha News)

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com