नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol), डिझेलची (Diesel) दरवाढ, स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) किमतीतील वाढ, भाजीपाल्याचे कडाडलेले भाव यामुळे देशातील जनतेची महागाईने होरपळ सुरू आहे. त्याचे प्रतिबिंब आता नोव्हेंबरच्या किरकोळ महागाई (Inflation) दरात दिसून आले आहे. नोव्हेंबरमध्ये देशात महागाईचा भडका उडाला असून किरकोळ महागाईचा दर 4.91 टक्क्यांवर पोचला. मागील तीन महिन्यांतील हा उच्चांकी दर आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) आज ही आकडेवारी जाहीर केली. कोरोनाचा प्रादुर्भाव, अनेक चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, इंधन दरांचा भडका यामुळे जनता त्रस्त झाली आहे. आधीच संकटाने वेढल्या गेलेल्या सर्वसामान्यांना महागाईचे चटके आणखी बसू लागले आहेत. नोव्हेंबरच्या किरकोळ महागाईचा दर उच्चांकी पातळीवर पोचला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे किरकोळ महागाई दर काढला जातो. हा दर नोव्हेंबरमध्ये 4.91 टक्क्यांवर पोचला आहे. हा दर रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या 2 ते 6 टक्क्यांच्या मर्यादेच्या आतमध्ये आहे.
सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.35 टक्के होता. ऑक्टोबरमध्ये तो दर 4.48 टक्क्यांवर गेला. भाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याने नोव्हेंबरमध्ये खाद्य महागाई वाढून 1.87 टक्के झाली. ती एक महिन्यापूर्वी 0.85 टक्के होती. वस्त्र आणि पादत्राणांची महागाई नोव्हेंबरमध्ये 7.94 टक्क्यांवर पोचली. ती ऑक्टोबर महिन्यात 7.39 टक्के होती.
नोव्हेंबरमध्ये इंधन आणि विजेचे महागाई दर 14.35 टक्क्यांवर पोचले आहे. ऑक्टोबरमध्ये हे दर 13.35 टक्क्यांवर होते. घरांच्या भाववाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 3.66 टक्क्यांवर पोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर 3.54 टक्के होता. इंधन दरातील वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.