Nana Patole State President : 'प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंनाच कायम ठेवा'; काँग्रेस नेत्यांची थेट दिल्लीवारी!

Nana Patole State President : पक्षातील नेत्यांनीच पटोलेंना केला होता विरोध..
Nana Patole State President :
Nana Patole State President : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काँग्रेसमधील काही बडे नेते नाराज असल्याची चर्चा होती. पटोले यांच्याविरोधात पक्षातला एक गट कार्यरत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचे वारे वाहत असल्याचे बोलले जात होते. मात्र आता काँग्रेसमधीव काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन, पटोले यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Nana Patole State President :
Ganesh Sugar Factory : गणेश कारखान्याच्या निवडणुकीत रंगत; 'कपबशी, छत्री अन् शेतकरी' मैदानात

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थनार्थ काल काँग्रेस नेत्यांनी घेतली पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. नागपूरतील, तसेच राज्यातील काही नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सचिव मुकुल वासनिक यांची भेट घेतली. यावेळी नागपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदारविकास ठाकरे, नवनिर्वाचितआमदार धिरज लिंगाडे, म्युझीब पठान, उमाकांत अग्निहोत्री यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली.

या भेटीत काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांनाच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. यासाठी राज्यातील नेत्यांनी दिल्लीवारी केली आहे. काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेसमधील एका गटाने काही दिवसांपूर्वी खर्गे यांची भेट घेतली होती. पटोलेंना पदावरून हटवण्याची यांनी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले समर्थकांची खर्गे यांची घेतलेली महत्त्वपूर्ण मानली जाते.

Nana Patole State President :
Sanjay Raut slams Devendra Fadnavis : फडणवीस, तुम्ही विरोधकांच्या हत्येचंही टेंडर काढलं ? ; राऊत संतापले ; 'औरंगजेब' चे सरकार चालू..

पक्षातील नेत्यांचाच पटोलेंना विरोध -

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात विजय वड्डेवट्टीवार, सुनील केदार (Sunil Kedar) आणि शिवाजीराव मोघे या विदर्भातील तीन दिग्गज नेत्यांनी आघाडी उघडली आहे.पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटत पटोले यांना बदलण्याची थेट मागणी त्यांनी केली होती. कॉंग्रेसचे मुंबईतील नेते संजय निरूपमदेखील त्यांच्यासोबत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com