Sanjay Raut slams Devendra Fadnavis : फडणवीस, तुम्ही विरोधकांच्या हत्येचंही टेंडर काढलं ? ; राऊत संतापले ; 'औरंगजेब' चे सरकार चालू..

Sanjay Raut slams Devendra Fadnavis : तुम्ही काय राजकीय विरोधकांची हत्या करण्याची सुपारी दिली आहे का?
Sanjay Raut slams Devendra Fadnavis
Sanjay Raut slams Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाचं पोस्टर किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून वाद निर्माण झाले आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही ठिकाणी आंदोलन, मोर्चेही काढण्यात आले. यावरुन राज्याचे वातावरण तापलं आहे. अशातच ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी टि्वट करीत देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे. आता पुन्हा एकदा शिंदे गट, भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात जुंपली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या एका चर्चासत्रात ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे सहभागी झाले होते. मात्र, या चर्चासत्रानंतर त्यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

“चर्चासत्र चालू असतानाच मला फोन आला. पण मी तो उचलला नाही. नंतर फोन केला असता सगळ्यात आधी मला समोरून विचारण्यात आलं की तू काय स्वत:ला छत्रपतींचा वंशज समजतोस का? टीव्हीवर पुढेपुढे करून बोलतोयस. त्यानंतर मला शिवीगाळ करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली”, असा दावा आनंद दुबेंनी केल्याचं इंडिया टीव्हीच्या वृत्तात नमूद केलं आहे.

Sanjay Raut slams Devendra Fadnavis
Assembly Election : पुण्यातील 'या' दोन मतदारसंघावर शिवसेनेचा दावा ; शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरुन संघर्ष...

राऊतांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारचा निषेध केला आहे. “महाराष्ट्रात हे काय चाललंय? खोके सरकारने ही काय परिस्थिती करून ठेवली आहे? शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे काल एका न्यूज चॅनलवर चर्चा करत होते, तेव्हा त्यांना ऑन एअर धमकावण्यात आलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत मौन बाळगले आहे.

"तुम्ही काय राजकीय विरोधकांची हत्या करण्याची सुपारी दिली आहे का? हत्येचंही टेंडर काढलं आहे का? देवेंद्र फडणवीस, उत्तर द्या. इथे तर औरंगजेबाचं सरकार चालू आहे”, असं संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Sanjay Raut slams Devendra Fadnavis
Assembly Election 2023 : दोन राज्यातील विजयानंतर निवडणुकीची जबाबदारी आता प्रियंका गांधींच्या खांद्यावर ; महिलांसाठी विशेष..

शिंदे गटाच्या नेत्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दाखल केली आहे. शिंदे गटाचे सचिव संजय माशेलकर यांनी आपल्याला धमकी दिली आहे.

'तु्झ्या पक्षाची बाजू मांडणं बंद कर नाहीतर तुझ्यासह तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकेन, अशी धमकी दिल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे. तर औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com