Rahul Gandhi Meet Party Workers : बैठक 'इंडिया'ची, आढावा महाराष्ट्राचा; राहुल गांधींचा एक तीर, दोन लक्ष्य !

Rahul Gandhi On India Meeting : दादर येथील पक्ष कार्यालयात राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा आयोजित..
Rahul Gandhi Meet Party Workers :
Rahul Gandhi Meet Party Workers : Sarkarnama

Mumbai News : इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्त मुंबईत येत असलेले काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi News) हे नाशिक जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गांधी हे राज्यातील सर्व शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यामुळे 'इंडिया' बैठकीच्या निमित्ताने गांधी यांनी महाराष्ट्रातील पक्षाचा आढावा घेणार आहेत. (Latest Marathi News)

Rahul Gandhi Meet Party Workers :
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 'RRR' पक्षाला सुपरहीट करणार का? सभांचा लावणार धडाका..

सत्ताधारी भाजपच्या विरोधात तयार झालेल्या विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीची आज मुंबईत बैठक होत आहे. बैठकीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी व सोनिया गांधी मुंबईत येत आहेत. बैठकीनिमित्त अनेक वर्षांनंतर सोनिया व राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे दादर येथील पक्ष कार्यालयात राहुल गांधी यांना खासदारकी बहाल झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सत्कार सोहळ्यानंतर राहुल गांधी बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

बैठकीसाठी राज्यभरातील सर्व शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. पक्षाची स्थिती ते जाणून घेणार आहेत. तसेच आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम आंदोलन भूमिका याबाबत ते मार्गदर्शन करतील. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या बैठकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी तीन समित्या स्थापन केले आहेत. त्यात माजी खासदार संजय निरूपम यांच्यासोबत २८ जणांचा यात समावेश आहे.

Rahul Gandhi Meet Party Workers :
Nashik NCP Executive : शरद पवार गटाची नाशिकमध्ये निवडणूक मार्चेबांधणी; नव्या शिलेदारांकडे राष्ट्रवादीचे सुकाणू

पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुक्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए.के. स्टॅलीन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com