Jalgaon News : आर आर आर हा सिनेमा चित्रपट देशभरात सुपरहीट झाला होता, त्यातील गाणी चांगलीच गाजली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची युवा टीम 'आरआरआर' राज्याच्या राजकारणात धमाका करण्यासाठी सज्ज आहे. रोहित पवार, रोहित पाटील व रोहिणी खडसे हे 'तीन आर' मैदानात उतरणार असून, आगामी काळात त्यांच्या सभांचा धडाका दिसणार आहे. त्यांची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून होणार आहे. (Latest Marathi News)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासह दिग्गज नेते भाजपसोबत सत्तेच्या दिशेने गेले, त्यामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र ही पोकळी भरून काढण्यासाठी युवा टीम पुढे आली आहे. त्यात शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आक्रमकपणे पुढे आहेत. ते पक्षातून फुटलेल्या नेत्यांवर सडकून टीका करीत आहेत, तर आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे सुध्दा रणांगणात उतरले असून शरद पवार यांची बाजू ते भक्कमपणे मांडत आहेत,
त्यांच्या सोबत आता एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या सुध्दा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी मैदानात उतरतील, त्यांची शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
रोहिणी खडसे आपले वडील एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे आक्रमक आहेत, त्यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहेत.जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर त्यांच्या सोबत त्या राष्ट्रवादीत कार्य करीत आहेत. जळगांव जिल्ह्यात अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे.
शरद पवार गटाच्या या तिन्ही आरआरआर युवा नेत्यांची आजच्या परिस्थितीत खरी कसोटी आहे. रोहित पवार राज्यात फिरत आहे त्यांच्या सोबत रोहित पाटील हे सुध्दा आहेत तीन सप्टेंबर पासून ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत ते जिल्ह्यात फिरणार आहेत. त्यांच्या समवेत आता नवीन महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे ही संदेश यात्रेत सभांचा धडका लावतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.