Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सुनक यांना संधी? 100 खासदारांचा पाठिंबा!

Rishi Sunak : सुनक यांच्या बाजूने वातावरण तयार होत आहे.
Rishi Sunak
Rishi SunakSarkarnama
Published on
Updated on

लंडन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक पुन्हा एकदा ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत. पंतप्रधानपदासाठी उमेदवारांच्या यादीत सामील होण्यासाठी सुनक यांना जवळपास 100 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. सुनक हे देशाचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून लिझ ट्रस यांची जागा घेण्याच्या स्पर्धेत आहेत. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन देखील पंतप्रधानाच्या शर्यतीत सामील होण्यासाठी ब्रिटनला परतले आहेत.

समर्थक खासदारांची वाढती संख्या :

42 वर्षीय सुनक यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे सुनक आणि जॉन्सन या दोघांनीही आतापर्यंत पक्षाचा नेता होण्यासाठी निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केलेली नाही.

Rishi Sunak
''भारत जोडो' यात्रेच्या प्रतिसादामुळे दिल्लीच्या राजाचे 'कान' उघडले!'

आतापर्यंत पेनी मॉर्डंट हे एकमेव उमेदवार आहेत ज्यांनी ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र माजी अर्थमंत्री सुनक यांना काही मंत्री आणि विविध गटांतील काही खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

Rishi Sunak
Liz Truss Resigns : ब्रिटनमध्ये राजकीय संकट; पंतप्रधान लिझ ट्रस यांचा 45 दिवसातच राजीनामा

सुनक योग्य उमेदवार :

माजी उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी बीबीसीला सांगितले की, "उन्हाळ्यात सुनक यांची योजना पूर्णपणे योग्य होती आणि मला वाटते की ती अजूनही योग्य आहे, आपल्याला देश आणि सरकारला पुढे न्यायचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com