मोदींच्या विश्वासू अधिकाऱ्याला लॉटरी! आधी विधान परिषद अन् आता थेट मंत्रिपद

उत्तर प्रदेशात प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.
Narendra Modi and A K Mishra 
Narendra Modi and A K Mishra Sarkarnama
Published on
Updated on

लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी काल (ता.25) दुसऱ्यांचा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपच्या विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, नेत्यांच्या उपस्थितीत योगींची दुसरी इनिंग सुरू झाली. यात ए.के.शर्मा (A.K.Sharma) यांनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे. शर्मा हे मोदींचे विश्वासू आणि निकटवर्ती निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.

मोदींचे विश्वासू ए.के.शर्मा यांच्यावर उत्तर प्रदेशात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. सुरवातीला त्यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात मागील वर्षी एंट्री झालेल्या शर्मांना एका वर्षाच्या आतच थेट मंत्रिपद मिळाले आहे. शर्मा यांचा मंत्रिमंडळातील समावेश म्हणजे मोदींनीच आता उत्तर प्रदेशात थेट लक्ष घातल्याचे हे निदर्शक आहे.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून शर्मा हे त्यांच्यासोबत काम करीत होते. मुख्यमंत्री म्हणून मोदींनी आखलेले अनेक महत्वकांक्षी प्रकल्प शर्मा यांनी पूर्णत्वास नेले होते. नंतर मोदी हे पंतप्रधान दिल्लीत आल्यानंतर शर्माही दिल्लीत आले. शर्मा हे कायम मोदींच्या अधिकाऱ्यांच्या निकटच्या वर्तुळात होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मागील वर्षी मोदींनी त्यांना उत्तर प्रदेशात पाठवले होते. त्याचवेळी नेमके योगी सरकार कोरोना संकटात अपयशी ठरले होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपमध्ये शर्मा यांच्याबद्दल आदरयुक्त दबदबा आहे. आता त्यांना थेट मंत्रिपद मिळाले आहे.

Narendra Modi and A K Mishra 
पहिल्याच दिवशी योगींचा मोठा निर्णय! 15 कोटी जनतेला दिली खूषखबर

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने (BJP) सलग दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ही निवडणूक लोकसभेच्या निवणुकीसाठी (LokSabha Election) महत्वाची मानली जात होती. त्यात योगींनी भाजपला बहुमत मिळवून दिले. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये कोणत्या नेत्यांचा समावेश करावा, यासाठी अनेक दिवस खलबते झाली. दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा करून योगींनी नव्या मंत्रिमंडळातील आमदारांची नावे निश्चित केली.

Narendra Modi and A K Mishra 
वाढता वाढता वाढे..! पेट्रोल, डिझेल 5 दिवसांत 3.20 रुपयांनी महागलं; सुमारे 25 रुपये वाढ अपेक्षित

या मंत्रिमंडळातून मोहसिन रजा यांच्यासह प्रतापसिंह, आशुतोष टंडन, सतीश महाना, श्रीकांत शर्मा यांच्यासारख्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निवडणुकीत पराभूत झालेले केशव प्रसाद मौर्य यांच्या गळ्यात पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. तसेच दिनेश शर्मा यांच्याजागी ब्राम्हण चेहरा म्हणून ब्रजेश पाठक यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. सुरेश कुमार खन्ना, सुर्य प्रदाप शाही, स्वतंत्रदेव सिंग, बेबी राणी मौर्य, लक्ष्मीनारायण चौधरी, जयवीर सिंग, धरमपाल सिंग, नंद गोपाल गुप्ता, भुपेंद्र सिंग चौधरी, अनिल राजभर, राकेश सच्चन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले जीतिन प्रसाद यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आधीच्या मंत्रिमंडळात त्यांचा काही महिन्यांआधीच समावेश करण्यात आला होता. त्यांनी आज पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com