Lalu Prasad Yadav : रिलेशनशिपच्या पोस्टने हादरलेल्या लालूंचा सर्वात मोठा निर्णय; मुलाची कुटुंबासह पक्षातूनही हकालपट्टी

Lalu Prasad Yadav’s Strong Move Against Tej Pratap : लालूंनी पुत्र व बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांची सहा वर्षांपासून पक्षातून हकालपट्टी केली आहे.
 Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात रविवारी सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मुलाची पक्षासह कुटुंबातूनही हकालपट्टी केली आहे. यापुढे त्यांची पक्षात आणि कुटुंबात कोणतीही भूमिका असणार नाही, अशी घोषणा लालूंनी केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लालूंनी पुत्र व बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांची सहा वर्षांपासून पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच कुटुंबासोबतचे त्यांचे नातेही तोडले आहे. तेजप्रताप यांनी शनिवारी सोशल मीडियात एक पोस्ट करत आपल्या रिलेशनशिपबाबत माहिती दिली होती. अनुष्का यादव नावाच्या मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिच्याशी आपले 12 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे यादव कुटुंबासह, राजद आणि बिहारमध्येही चर्चांना ऊत आला.

तेजप्रताप यांनी काही वेळातच पोस्ट डिलीट करत आपले अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले होते. तर आपले फोटो एडिट केल्याचे त्यांनी सांगितले होते. पण त्यानंतरही त्यांचे वडील व राजदचे प्रमुख लालू प्रसाद यांनी रविवारी सर्वात मोठा निर्णय घेतल्याने खडबळ उडाली आहे. त्यांनी सोशल मीडियातच याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.

 Lalu Prasad Yadav
Lal Nishan And Communist Party merger : देशात मोठी राजकीय घडामोड; लाल निशाण पक्षाचं 'भाकप' लिबरेशनमध्ये 'विलय'

काय म्हटले लालू प्रसाद यादव?

लालूंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, खासगी आयुष्यात नैतिक मुल्यांची अवहेलना करणे म्हणजे आपल्या सामाजिक न्यायासाठीच्य सामूहिक संघर्षाला कमजोर करण्यासारखे आहे. ज्येष्ठ मुलाचे बेजबाबदार वागणे आमची कौटुंबिक मुल्ये आणि संस्कारांच्या विपरीत आहे. त्यामुळे त्यांना पक्ष आणि कुटुंबापासून दूर करतो.

आतापासून पक्ष आणि कुटुंबाशी त्यांचा कोणताही संबंध नसेल. त्यांना पक्षातून सहा वर्षांपासून निलंबित केले जात आहे, अशी मोठी घोषणा लालूंनी केली आहे. आपल्या खासगी आयुष्याबाबत चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यात ते स्वत: सक्षम आहेत. त्यांच्यासोबत जे लोक संबंध ठेवतील, त्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा, अशा इशाराही लालूंनी दिला आहे.

 Lalu Prasad Yadav
India 4th Largest Economy: इतिहास रचला! जपानला टाकलं मागे, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात नेहमीच सामाजिक मर्यादांचे पालन केले आहे, असे म्हणत लालूंनी आपली पोस्ट संपविली आहे. लालूंच्या या पोस्टमध्य बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तेजप्रताप यादव यापूर्वीही वादात अडकले होते. त्यांचे बंधू व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वावरून यापूर्वी खटके उडाले होते. मात्र, यावेळी तेजप्रताप यांनी आपल्या खासगी आयुष्याची माहिती सार्वजनिक केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com