Smriti Irani daughters wedding: स्मृती इराणींच्या मुलीचा शाही विवाह होणार; 500 वर्ष जुन्या किल्ल्यात

Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शनेल इराणी हिच्या शाही लग्नाचा सोहळा जोधपूरमध्ये.
Smriti Irani
Smriti IraniSarkarnama
Published on
Updated on

Smriti Irani daughters wedding: जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लग्नाचे वारे वाहतांना दिसत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी शेनेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हा विवाह राजस्थान मधील नागौर जिल्ह्यात 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान खिंवसार किल्ल्यावर शाही होणार आहे.

२०२१मध्ये शनेलचा अर्जुन भल्लाबरोबर साखरपुडा पार पडला होता. खींवसर फोर्टमध्येच अर्जुनने शनेलला लग्नाची मागणी घातली होती. आता याच ठिकाणी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान येथील नागौर जिल्ह्यामध्ये जोधपूर व नागौरच्या मध्यभागी असलेल्या 500 वर्ष जुना खींवसर किल्ला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेनेल अर्जुन भल्लासोबत लग्न करणार आहे. या संदर्भात स्मृती इराणी यांचे पती झुबेन मंगळवारी खिंवसार किल्ल्यावर पोहोचले आहेत. लग्नात सहभागी होण्यासाठी आणखी बरेच पाहुणे येणार आहेत. वधू शनेल आणि वर अर्जुन भल्ला आधीच खिंवसर किल्ल्यावर पोहोचले आहेत. शनेल ही स्मृती यांचे पती जुबिन इराणी यांची पहिली पत्नी मोनाची मुलगी आहे.

खिंवसरा किल्ल्याची वैशिष्ट्ये :

या किल्ल्यामध्ये 71 खोल्या आणि चार रेस्टॉरंट आहेत. तसेच स्विमिंग पूल, जिम, स्पाही उपलब्ध आहे. शनेल आणि अर्जुनचे लग्न ज्या किल्ल्यात होणार आहे तो किल्ला जवळपास 500 वर्षे जुना आहे. अनेक बॉलिवूड स्टार्सचीही या किल्ल्याला पहिली पसंती आहे. अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे. या किल्ल्याची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे या किल्ल्याच्या एका बाजुला वाळवंट तर दुसऱ्या बाजुला सुंदर तळे आहे. १५२३ मध्ये हा किल्ला राव करमसजी यांनी बांधला होता. ते जोधपुरचे राव जोधा यांचे आठवे पुत्र होते. पंधराव्या शतकात तयार झालेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती असते. तसेच बर्याच काळापासून, राजस्थान हे देशातील आणि जगातील सर्वोत्तम वेडिंग डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय आहे.

Smriti Irani
Narendra Modi : पंतप्रधान मोदी संसदेत दीड तास बोलले; पण आदानीचा 'अ' देखील उच्चारला नाही !

कोण आहे स्मृती इराणी यांची मुलगी:

शेनेल इराणी एक वकील आहे आणि तिचे शालेय शिक्षण मुंबई येथे झाले. शेनेल उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. त्यांमी जॉर्जटाउन विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. शेनेल इराणी ही झुबिन आणि त्यांची पहिली पत्नी मोना इराणी यांची मुलगी आहे. तसेच स्मृती आणि झुबिन इराणी यांना मुलगा जोर आणि मुलगी जोइश ही दोन आपत्य आहेत.

कोण आहे स्मृती इराणींचा भावी जावई?

स्मृती इराणींच्या भावी जावयी अर्जुन भल्ला. कॅनडातील टोरंटो येथे जन्मलेला अर्जुन आपल्या संपूर्ण कुटुंबासह  कॅनडामध्ये राहतो. अर्जुनने कॅनडातील सेंट रॉबर्ट कॅथोलिक हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. अर्जुनने लिसेस्टर विद्यापीठातून एलएलबी केले आहे. 2014 मध्ये त्यांनी कॅनडामध्ये अकाउंट मैनेजर म्हणून काम केले. सध्या अर्जुन लंडनमधून एमबीए करत आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com