Narendra Modi : पंतप्रधान मोदी संसदेत दीड तास बोलले; पण आदानीचा 'अ' देखील उच्चारला नाही !

Narendra Modi : "ईडीच्या भीतीमुळे विरोधक एकत्र," पंतप्रधानांनी डिवचलं!
Narendra Modi :
Narendra Modi :Sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. अदानी प्रकरणी राहुल गांधी यांनी विचारले होते की, सरकार आणि अदानी यांचा संबंध काय? गौतम अदानी ६०९ व्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कसे बनले, ही संपूर्ण जादू मोदी सरकार आल्यानंतर कशी काय घडून आली? यानंतर आत आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र यावेळी संपूर्ण भाषणात एकदाही त्यांनी अदानी प्रकरणावर भाष्य केले नाही.

Narendra Modi :
Satyajeet Tambe : आमदारकीची शपथ घेताच सत्यजित तांबे पोचले थेट आझाद मैदानावर

मोदी आज हिंडेनबर्ग अहवाल व त्या अनुषंगाने अदानी कोसळलेले शेअर्स या प्रकरणावर बोलतील, काही भूमिका मांडतील अशी शक्यता होती. विरोधी पक्षांना अदानी प्रकरणावरून मोदींवर टीका करत होते. केंद्र सरकारवरला धारेवर धरत होते.

मात्र आजच्या आपल्या जवळपास १ तास २५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी एकदाही अदानी प्रकरणावर एका शब्दानेही भाष्य केले नाही. अदानी प्रकरणावर बोलायचे मोदींनी टाळले आहे. विरोधकांनी याप्रकरणी विचारलेले एका प्रश्नांवर मोदींनी उत्तर दिले नाही. यामुळे आता मोदींना अदानी प्रकरणावर भाष्य करायचे टाळले, यावर चर्चा होताना दिसून येत आहे.

Narendra Modi :
Narendra Modi Speech : 'ईडी'चे आभार मानायला हवे, विरोधकांना त्यांनी एकत्र आणलं, मोदींचा टोला!

"अदानी प्रकरणात मोदींनी भाष्य टाळले असले तरी, त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या एकजुटीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, आज विरोधकांचे गीत मिले सूर मेरा तुम्हारा आहे. ईडीमुळे ही विरोधकांची एकजूट झाली आहे. ईडीच्या तपासाच्या भीतीने या लोकांना एका मंचावर आणले आहे," असे मोदी म्हणाले.

काही लोक हार्वर्ड विद्यापीठाबद्दल खूप बोलतात. हार्वर्ड विद्यापीठाने गेल्या काही दिवसात मोठा अभ्यास केला आहे. तो विषय भारतीय काँग्रेस पक्षाचा उदय आणि अधःपतन. मला खात्री आहे की आणखी मोठ्या विद्यापीठांमध्ये काँग्रेसचा विनाश यावर आणखी अभ्यास व्हायला हवा, " असा वार मोदींनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com