
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजाने फक्त तीन मुलांना जन्म द्यावा असा सल्ला दिला.
धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय असून लोभ वा दबाव नसावा असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थलांतरितांना नोकरी न देता आपल्या देशातील मुस्लिमांना रोजगार द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
Pune News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात देशातील मुस्लिम समाजाला उद्देशून काही गोष्टींकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे. ते संघाच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मुस्लिमांनी आपत्य जन्माला घातला किती घालावेत याचा आकडाही सांगितला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची सध्या देशभर चर्चा होत आहे.
सध्या देशात मुस्लिमविरोधी वातावरण तयार केलं जात असतानाच मोहन भागवत यांनी धर्मांतर आणि बेकायदेशीर घुसखोरीवर वक्तव्य केले. त्यांनी, ‘धर्म हा वैयक्तिक विषय असून त्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. तर सध्या देशाच्या समोर घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा मोठा प्रश्न आहे.
त्यावर केंद्र सरकार पावले उचलत आहे. तसेच आपलेही काही कर्तव्य असून समाजाने ती पार पाडायला हवी. समाजाने अशा घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना येथे राहण्यास मनाई करावी. त्यांना कोणी नोकरी देऊ नये. नोकऱ्या आपल्या देशाचा नागरिक असणाऱ्या मुस्लिमांना द्याव्यात.
3 मुलांनाच जन्म द्यावा
यावेळी त्यांनी वाढत्या भारताच्या लोकसंख्येवर भाष्य करताना, याला तीन घटक जबाबदार आहेत. ज्यात धर्मांतर काही मुस्लिम उलेमा आणि लोकसंख्या वाढीचा दर कारणीभूत आहे. इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणे पाप असून बेकायदेशीर स्थलांतर होताना दिसत आहे. तर काही मुस्लिम उलेमा जास्त मुलं जन्माला घालण्याचा सल्ला देवून संतुलन बिघडवतं आहेत. त्यामुळे मुस्लिम लोकांनी कमीत कमी 3 मुले जन्माला घालावीत, यामुळे समाजात असंतुलन निर्माण होईल.
प्र.१. मोहन भागवत यांनी काय वक्तव्य केले?
उ. त्यांनी मुस्लिम समाजाने तीनच मुलांना जन्म द्यावा असा सल्ला दिला तसेच बेकायदेशीर स्थलांतरितांना नोकरी देऊ नये असे सांगितले.
प्र.२. हे वक्तव्य कुठे झाले?
उ. हे भाषण आरएसएसच्या 100 वर्षांच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी केले.
प्र.३. धर्माविषयी भागवत काय म्हणाले?
उ. धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय असून त्यात दबाव किंवा लोभ असू नये असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.