...अन् काही मिनिटांतच शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी रुपये पाण्यात!

Russia announced an operation in Ukraine : परदेशी गुंतवणूकदारांनी एका दिवसात ३ हजार ४१७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
Share market
Share market Sarkarnama

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरूध्द (Russia-Ukraine Crisis) युध्द पुकारले असून जोरदार हल्लाही सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला हादरा बदला आहे. अमेरिकेसह अन्य देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पण रशियाने (Russia) जगातील इतर देशांनाही गर्भित इशारा दिला आहे. मात्र या युद्धाचा भारतावरही गंभीर परिणाम पाहायला मिळत असून आज सकाळी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे अवघ्या काही मिनीटातच गुंतवणूकदारांचे तब्बल ८ लाख कोटी रुपये पाण्यात गेले.

सकाळी बाजार सुरु होताच सेंसेक्स १८०० पेक्षा जास्त अंकानी घसरला तर निफ्टी देखील घसरत जवळपास १६ हजार ६०० अंकांन जवळ पोहचला. गुंतवणूकदारांना सर्वात जास्त नुकसान एयरटेल, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा आणि एसबीआयच्या शेअर्समधये झाले. याशिवाय युक्रेन-रशिया संकटामुळे खनिज तेल ८ वर्षात पहिल्यांदाच वाढून १०० डॉलर प्रतिबॅरल झाले आहे. शेअर बाजारातील या आकड्यांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी एका दिवसात ३ हजार ४१७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

पुतिन यांची युद्धाची घोषणा :

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. "शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ" असा इशारा देखील रशियाने यावेळी युक्रेनला (Ukraine) दिला आहे. तसेच पुतिन यांनी भाषण करताना "रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांना आपण तात्काळ उत्तर देवू असाही थेट इशारा दिला आहे. सोबतच रशियाने केलेली कारवाई ही स्वसंरक्षणासाठी असल्याचे सांगत कारवाईचे समर्थन केले आहे.

Share market
रशियाकडून हल्ल्याची घोषणा; "शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ" युक्रेनला इशारा

पुतिन यांनी भाषणादरम्यान जगातील इतर देशांनाही सावधगिरीचा इशारा दिला आहे. रशियाच्या कारवाईत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आमच्या नागरिकांना किंवा देशाला हानी पोहचविण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या इतिहासात कधीही अनुभवले नसेल एवढे भयानक परिणाम होतील, असं पुतिन यांनी म्हटले आहे.

पुतीन यांच्या भाषणाच्या काही मिनीटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा दिला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

पुतिन यांनी निवडेल्या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी होणार असल्याची भितीही यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. यातील प्रत्येक प्राणहानीसाठी केवळ रशियाच जबाबदार असेल. मात्र अमेरिका आणि सहकारी निर्णायकपणे रशियाला प्रत्युत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण जगातील नागरिक युक्रेनच्या नागरिकांसोबत आहेत, असा आशावाद त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com