रशियाकडून हल्ल्याची घोषणा; "शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ" युक्रेनला इशारा

Russia announced an operation in Ukraine : "रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांना आपण तात्काळ उत्तर देवू
Vladimir Putin
Vladimir PutinSarkarnama
Published on
Updated on

युक्रेनमधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देऊन दोन नव्या राष्ट्रांची निर्मिती केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर वातावरण तणावाचं बनलं आहे. अशा स्थितीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलावून पुतीन यांना रोखण्यासाठी विनंती केली जात असतानाच रशियाकडून हल्ल्याची घोषणा करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू करत असल्याची घोषणा ट्विव्हीवरुन भाषण करत असताना केली आहे. (Russia Ukraine War Crisis)

"शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ" असा इशारा देखील रशियाने यावेळी युक्रेनला दिला आहे. तसेच पुतिन यांनी भाषण करताना "रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांना आपण तात्काळ उत्तर देवू असाही थेट इशारा दिला आहे. सोबतच रशियाने केलेली कारवाई ही स्वसंरक्षणासाठी असल्याचे सांगत कारवाईचे समर्थन केले आहे. पुतिन यांनी भाषण करण्याच्या काही मिनीटांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांनी कोणत्याही प्रकारची कारवाई ही मोठ्या प्रमाणावर मानवी विनाशाला कारणीभूत ठरू शकते, असा इशारा दिला होता.

दरम्यान या सगळ्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पुतिन यांनी निवडेल्या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी होणार असल्याची भितीही यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. यातील प्रत्येक प्राणहानीसाठी केवळ रशियाच जबाबदार असेल. मात्र अमेरिका आणि सहकारी निर्णायकपणे रशियाला प्रत्युत्तर देतील, असे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण जगातील नागरिक युक्रेनच्या नागरिकांसोबत आहेत असा आशावाद त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com