UNSC:युक्रेन-रशिया युद्धाचा भारताकडून निषेध ; मतदानावर बहिष्कार

युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडींनी भारत खूपच अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. ''हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत, अशी आमची विनंती आहे.
India Ambassador to the United Nations T. S. Tirumurti
India Ambassador to the United Nations T. S. Tirumurtisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये रशियन (Russia) सैन्य आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात संघर्ष सुरू आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत (UN Security Council meeting) विविध देश या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने युक्रेनच्या हल्ल्याचा निषेध केला आणि सुरक्षा परिषदेत मतदान करणे टाळले.

नुकत्याच झालेल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने या युद्धाचा निषेध (India has condemned the war)केला आहे. या युद्धाबाबत भारताने आपली भूमिका मांडली आहे. युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडींनी भारत खूपच अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. ''हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत, अशी आमची विनंती आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणताही उपाय शोधला जाऊ शकत नाही,'' अशी भूमिका भारताने मांडली आहे.

India Ambassador to the United Nations T. S. Tirumurti
लवकर सुटका करा..विद्यार्थ्यांची सरकारला आर्त साद, मायदेशी येण्याची आस!

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारत आणि चीनने शुक्रवारी मांडलेल्या रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या टीकेच्या ठरावात आपली भूमिका स्पष्ट केली आणि मतदानापासून दूर राहिले. रशियाचे रोमन बाबुश्किन म्हणाले की या बैठकीत भारत रशियाला पाठिंबा देईल, रशियाला आशा आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यासमोर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी, वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले की, ‘मी पुन्हा एकदा रशियाच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की, लोकांचे मृत्यू थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन वाटाघाटी करणे गरजेचे आहे.’ एका व्हिडीओद्वारे झेलेन्स्की यांनी हा संदेश दिला.

रशिया (Russia)आणि युक्रेनमधील युद्धामुळे शिक्षणासाठी युक्रेमध्ये (Ukraine)असणारे देशातील अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. युध्दामुळे तेथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. याठिकाणी एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडचणीत आले आहेत. युक्रेनमधून २७०च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियात हलवले आहे. ते दोन दिवसात भारतात येणार आहेत.

यात अमरावती जिल्ह्यातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र युक्रेन मधील भारतीय दूतावास व भारत सरकारने तातडीने पावले उचलत युक्रेनच्या चर्नोव्हस्की व आसपासच्या भागातील २७० च्यावर विद्यार्थ्याना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात नेले आहे. रोमानियाच्या बोर्डर वर रोमानियन जनतेने भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com