S Jaishankar on Pakistan : एस जयशंकर यांनी शहबाज शरीफ यांच्यासमोरच पाकिस्तानला सुनावलं, म्हणाले...

S Jaishankar at SCO Summit : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ; बोलता बोलता चीनवरही साधला निशाणा!
S Jaishankar
S JaishankarSarkarnama
Published on
Updated on

S Jaishankar Targeted Pakistan and China : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर एससीओ समिटसाठी सध्या पाकिस्तानात आहेत. या दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासमोरच एस जयशंकर यांनी पाकिस्तानाला दहशतवादावरून सुनावलं. इस्लामाबादेत एससीओ मीटिंग दरम्यान कडक इशारा देत, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी सीमापार दहशतवादाच्या मुद्य्यावर पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला.

एस जशंकर(S Jaishankar) यांनी म्हटले की, पाकिस्तानला या मुद्य्यावर आत्मनिरीक्षण करणे आवश्यक आहे, की दोन्ही देशांचे संबंध का खराब झाले आहेत. यावेळी जयशंकर यांनी चीनवरही निशाणा साधला. त्यांनी इशाऱ्या-इशाऱ्यात सीपीईसी प्रोजेक्टचा मुद्दा उचलला आणि म्हटले की एकतर्फी एजन्सीद्वारे एससीओचे उद्दिष्ट साध्य होणार नाही.

S Jaishankar
S Jaishankar in Pakistan : जयशंकर यांचा पाकिस्तानात स्वॅग; काल ऐटीत एन्ट्री, आज रस्त्यावर मॉर्निंग वॉक...

याशिवाय एससीओच्या मंचावरून एस जयशंकर म्हणाले, जर विश्वास नाही किंवा सहकार्याची कमी आहे, जर मैत्री कमी झाली आहे आणि शेजारधर्मासारखी वागणूक नसेल, तर कारणं शोधली पाहीजेत आणि ती दूर केली पाहीजेत. खरंतर जयशंकर यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख केला नाही, परंतु त्यांचा रोख स्पष्ट होता. जयशंकर यांनी म्हटले की जर सीमेपलीकडून दहशतवाद, उग्रवाद आणि फुटीरतावादास प्रोत्साहन दिलं गेलं, तर व्यापार, ऊर्जा प्रवाह आणि लोकांचा आपसांतील संपर्क कसा वाढेल?. त्यांनी टोला लगावत म्हटले की कट्टरतावादातून कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. विकासासाठी शांतता आवश्यक आहे.

S Jaishankar
Mahadev Jankar News : महादेव जानकरांचं ठरलं! ; महायुतीला सोडचिठ्ठी, विधानसभा स्वबळावरच लढवणार

यावेळी बोलताना परराष्ट्रमंत्री एस जशंकर यांनी चीनवरही निशाणा साधला. सीपीईसी प्रोजेक्टचा उल्लेख न करता, जयशंकर यांनी म्हटले की जर आपण जगातील काही निवडक पद्धतींचे पालन केले, विशेषत: व्यापार आणि व्यावसायिक मार्गांवर, तर सदस्य देश प्रगती करू शकणार नाहीत. तसेच, 'SCO सदस्य देशांमधील सहकार्य परस्पर आदर आणि सार्वभौम समानतेवर आधारित असले पाहिजे. यासाठी सर्व देशांनी प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व मान्य करणे आवश्यक आहे. असंही जयशंकर यांनी म्हटले आहे.

यासाठी वास्तविक भागीदारी निर्माण होणे गरजेचे आहे. एकतर्फी अजेंडा पुढे रेटला गेला नाही पाहीजे. जर आपण अशा जागतिक पद्धती विशेषत: व्यापार आणि पारगमन निवडल्या तर हे प्रगती करू शकत नाहीत. भारताने CPEC प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com