New Delhi : पाकिस्तानात तब्बल नऊ वर्षांनंतर भारताचे परराष्ट्र मंत्री पोहचले आहेत. सुषमा स्वराज यांच्यानंतर पहिल्यांदाच एस. जयशंकर पाकिस्तानात गेले आहे. यावर्षी शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक पाकिस्तानात होत आहे. त्यासाठी जयशंकर हे मंगळवारीच पाकिस्तानात दाखल झाले आहेत.
मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे जयशंकर यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. पाकिस्तानात पोहचले त्यावेळी त्यांची ऐट काही वेगळीच होते. डोळ्यावर काळा गॉगल घालून आणि आत्मविश्वासानेच त्यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची मंगळवारी सायंकाळी जयशंकर यांनी भेट घेतली. बुधवारी सकाळी बैठकीआधी जयशंकर यांनी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक केला. तसेच दुतावासाच्या आवारासत वृक्षारोपणही केले.
जयशंकर यांनी ‘एक्स’वर मॉर्निंग वॉक आणि वृक्षारोपणाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ते ट्रॅक पॅन्ट आणि टी-शर्टमध्ये दिसत आहेत. त्यांच्या आजुबाजूला दुतावासातील अधिकारीही आहेत. पाकिस्तानातील दुतावासाच्या आवारात इतर सहकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉक करत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या आवाहनानुसार जयशंकर यांनी पाकिस्तानातही वृक्षारोपण केले. दरम्यान, आज इस्लामाबादमधील जिना सेंटरमध्ये एससीओ बैठक होत आहे. जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व करणार असले तरी या बैठकीमध्ये किंवा नंतर पाकिस्तान व भारतामध्ये कोणतीही द्विपक्षीय पातळीवर चर्चा होणार नाही, असे समजते. बैठकीमध्ये चीन, बेलारूस, कझाकस्तान, रशिया, उझबेकिस्तान, इराण आदी देशांचे नेतेही बैठकीत सहभाग होत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.