भाजपनं चुकून आपल्याच पक्षाच्या उद्योगपतीवर छापे मारले!

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर मारण्यात आलेल्या छाप्याची चर्चा आहे.
Piyush Jain

Piyush Jain

Sarkarnama

Published on
Updated on

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला जोर चढला आहे. आता एका उद्योगपतीकडे दोनशे कोटी रूपये सापडल्याचा मुद्दा प्रचारात गाजू लागला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यात जुंपली आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. प्रसिद्ध अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरात सापडलेल्या दोनशे कोटी रुपयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने आपल्याच उद्योगपतीवर चुकून छापे मारले, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. जैन यांचे कॉल रेकॉर्ड जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जैन यांच्या कॉल रेकॉर्डमधून अनेक भाजप नेत्यांची नावे समोर येतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. अखिलेश यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

<div class="paragraphs"><p>Piyush Jain</p></div>
प्रचारात पीयूष जैन यांचाच बोलबाला! अखेर मोदी-शहांकडूनही अखिलेश यादवांना विचारणा

सुगंधी द्रव्ये आणि अत्तराचे व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर छापा टाकून वस्तू व सेवा कर गुप्तचर संचालनालयाने (DGGI) तब्बल 250 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. जैन यांना आता अटक करण्यात आली असून, त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. जैन यांचे मूळ शहर कनौज आहे. कानपूरमध्ये त्यांनी सुरू केलेला अत्तर व्यवसाय आता देशातील 15 राज्यांमध्ये पसरला आहे. जैन यांचा व्यवसाय विस्तार मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

<div class="paragraphs"><p>Piyush Jain</p></div>
कोरोना लशीचा बूस्टर डोस घ्यायचाय? आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी मुभा

डीजीजीआयने जैन यांचे घर, कंपनी, कार्यालयांसह त्यांच्या भागीदारांच्या घरावर छापे टाकले आहेत. यात 194 कोटी रूपयांची रोकड आणि 27 किलो सोने जप्त केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती फ्रॅगरन्स या कंपनीशी संबंधित कानपूर आणि अन्य ठिकाणी देखील छापे घालण्यात आले. जैन यांच्या घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी तब्बल आठ मशिन वापरण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी पीयूष जैन यांच्या कंपनीने समाजवादी अत्तर बाजारात आणले होते. या कारवाईनंतर पीयूष जैन यांच्या उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित अनेक बाबी समोर आल्या आहेत. जैन यांच्या मालकीच्या चाळीसहून अधिक कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून ते अत्तराचा व्यवसाय करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com