प्रचारात पीयूष जैन यांचाच बोलबाला! अखेर मोदी-शहांकडूनही अखिलेश यादवांना विचारणा

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला जोर चढला आहे.
Narendra Modi and Amit Shah

Narendra Modi and Amit Shah

Sarkarnama

Published on
Updated on

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीला जोर चढला आहे. आता एका उद्योगपतीकडे दोनशे कोटी रूपये सापडल्याचा मुद्दा प्रचारात गाजू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या मुद्द्यावरुन समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशात भाजप विरुद्ध समाजवादी पक्षात जुंपली आहे. येथे एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी अखिलेश यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, नोटांनी भरलेले बॉक्स सापडले आहेत. आता समाजवादी पक्ष म्हणेल हे आम्हीच आधी करून ठेवले आहे. कानपूरमधील नागरिकांना व्यवसाय आणि व्यापार चांगलाच कळतो. उत्तर प्रदेशात 2017च्या आधी भ्रष्टाचाराचे अत्तर सगळीकडे शिंपडले गेले होते. आता मात्र, त्यांची तोंडे बंद झाली आहेत. नोटांचा डोंगर संपूर्ण देशाने पाहिला असून, त्याचे श्रेय घेण्यासाठी ते पुढे येताना दिसत नाहीत. उत्तर प्रदेशातील जनतेला सगळे समजते.

येथील प्रचारसभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या अत्तर व्यावसायिकाला पकडण्यात आले आहे. अखिलेशजी म्हणते आहेत की, छापे कशाला मारत आहात. पीयूष जैनच्या घरातून 250 कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. अखिलेशजी हे पैसे कुठून आले?

<div class="paragraphs"><p>Narendra Modi and Amit Shah</p></div>
कोरोना लशीचा बूस्टर डोस घ्यायचाय? आरोग्य मंत्रालयाने दिली मोठी मुभा

सुगंधी द्रव्ये आणि अत्तराचे व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर छापा टाकून वस्तू व सेवा कर गुप्तचर संचालनालयाने (DGGI) तब्बल 250 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. जैन यांना आता अटक करण्यात आली असून, त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. जैन यांचे मूळ शहर कनौज आहे. कानपूरमध्ये त्यांनी सुरू केलेला अत्तर व्यवसाय आता देशातील 15 राज्यांमध्ये पसरला आहे. जैन यांचा व्यवसाय विस्तार मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

<div class="paragraphs"><p>Narendra Modi and Amit Shah</p></div>
ओमिक्रॉन विरोधातील लढ्याला बळ! कोरोनावर आणखी दोन लशी अन् गोळीही

डीजीजीआयने जैन यांचे घर, कंपनी, कार्यालयांसह त्यांच्या भागीदारांच्या घरावर छापे टाकले आहेत. यात 194 कोटी रूपयांची रोकड आणि 27 किलो सोने जप्त केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती फ्रॅगरन्स या कंपनीशी संबंधित कानपूर आणि अन्य ठिकाणी देखील छापे घालण्यात आले. जैन यांच्या घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी तब्बल आठ मशिन वापरण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी पीयूष जैन यांच्या कंपनीने समाजवादी अत्तर बाजारात आणले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com