
Piyush Jain
Sarkarnama
कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आता विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. यातही एका उद्योगपतीवर पडलेल्या छाप्यांची मोठी चर्चा सुरू आहे. पीयूष जैन (Piyush Jain) असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावरील छाप्यांची कारवाई अखेर आठवडाभरानंतर संपली आहे. आता विधानसभेच्या प्रचारात हा मुद्दा गाजू लागला असून, या प्रकरणी वेगळाच गोंधळ समोर येऊ लागला आहे.
समाजवादी अत्तर बाजारात आणणारे पीयूष जैन हेच आहेत, असा आरोप भाजप नेते करीत आहेत. याच आधारे भाजप नेते जैन यांचे कनेक्शन समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्याशी जोडत आहेत. आता समाजवादी अत्तर बाजारात आणणारे पुष्पराज जैन हे असल्याचे समोर आले आहे. ते समाजवादी पक्षाचे नेते आहेत. पुष्पराज जैन यांच्यावर छापे टाकायचे होते पण चुकून भाजपने त्यांचेच उद्योगपती पीयूष जैन यांच्यावर टाकले, असा आरोप करण्यात येत आहे.
माझा पीयूष जैन यांच्याशी कोणताही संबंध नाही. माझ्या नावाचा वापर करून राजकारण सुरू आहे. यामुळे मी व्यथित झालो आहे. माझ्या नावाचा वापर छाप्यांसाठी करणे हे अतिशय खालच्या पातळीचे आहे. हे छापे कदाचित माझ्यावरच पडणार होते पण ते चुकून दुसऱ्या जैनवर पडले असावेत, असा खुलासा पुष्पराज जैन यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी याचा इन्कार करीत हे छापे पीयूष जैन यांच्यावरच टाकण्यात येणार होते, असा दावा केला आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. प्रसिद्ध अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरात सापडलेल्या दोनशे कोटी रुपयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहांनी जैन यांचा संबंध समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी जोडला आहे. भाजपने आपल्याच उद्योगपतीवर चुकून छापे मारले, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. जैन यांचे कॉल रेकॉर्ड जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जैन यांच्या कॉल रेकॉर्डमधून अनेक भाजप नेत्यांची नावे समोर येतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.