जैन यांची संपत्ती मोजण्यास लागला आठवडा; 196 कोटी कॅश अन् 23 किलो सोने

पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावरील छाप्यांची कारवाई अखेर आठवडाभरानंतर संपली आहे.
Piyush Jain 

Piyush Jain 

Sarkarnama

Published on
Updated on

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीतही एका उद्योगपतीवर पडलेल्या छाप्यांची मोठी चर्चा सुरू आहे. पीयूष जैन (Piyush Jain) असे त्यांचे नाव असून, त्यांच्यावरील छाप्यांची कारवाई अखेर आठवडाभरानंतर संपली आहे. त्यांच्याकडील संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. हा छापा देशातील आतापर्यंतच्या मोठ्या छाप्यांपैकी एक मानला जात आहे.

सुगंधी द्रव्ये आणि अत्तराचे व्यापारी पीयूष जैन यांच्यावरवस्तू व सेवा कर गुप्तचर संचालनालयाने (DGGI) छापा टाकला होता. हे छापे सलग आठवडाभर सुरू होते आणि जैन यांच्या संपत्तीची मोजदादही त्याचवेळी सुरू होती. जैन यांच्याकडून 196 कोटी रुपयांची रोकड, 23 किलो सोने आणि 600 किलो चंदन तेल जप्त करण्यात आले आहे. तब्बल 250 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. दरम्यान, जैन यांना अटक करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>Piyush Jain&nbsp;</p></div>
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट? रुग्णसंख्या वाढीचा वेग पहिल्या व दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त

जैन यांचे मूळ शहर कनौज आहे. कानपूरमध्ये त्यांनी सुरू केलेला अत्तर व्यवसाय आता देशातील 15 राज्यांमध्ये पसरला आहे. जैन यांचा व्यवसाय विस्तार मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. डीजीजीआयने जैन यांचे घर, कंपनी, कार्यालयांसह त्यांच्या भागीदारांच्या घरावर छापे टाकले आहेत. कनौज आणि कानपूरमध्ये प्रामुख्याने ही कारवाई करण्यात आली होती. जैन यांच्या घरी सापडलेले पैसे स्टेट बँकेत ठेवण्यात आले असून, महसुली गुप्तचर संचालनालयाच्या ताब्यात सोने ठेवण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Piyush Jain&nbsp;</p></div>
भाजपनं चुकून आपल्याच पक्षाच्या उद्योगपतीवर छापे मारले!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाने दिलेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती फ्रॅगरन्स या कंपनीशी संबंधित कानपूर आणि अन्य ठिकाणी देखील छापे घालण्यात आले. जैन यांच्या घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी तब्बल आठ मशिन वापरण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी पीयूष जैन यांच्या कंपनीने समाजवादी अत्तर बाजारात आणले होते. या कारवाईनंतर पीयूष जैन यांच्या उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित अनेक बाबी समोर आल्या आहेत. जैन यांच्या मालकीच्या चाळीसहून अधिक कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून ते अत्तराचा व्यवसाय करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com