CID Enquiry : मुख्यमंत्र्यांसाठीचा समोसा दिला कर्मचाऱ्यांना, थेट CID चौकशी सुरू; नेमकं काय घडलं?

CM Sukhvinder Singh Sukhu Samosa and Cake Issue Probe : सुखविंदर सिंह सुक्खू हे एका कार्यक्रमासाठी सीआयडी कार्यालयात गेलेले असताना हा प्रकार घडला आहे.
Sukhvinder Singh Sukhu
Sukhvinder Singh SukhuSarkarnama
Published on
Updated on

Himachal Pradesh News : मुख्यमंत्र्यांसाठी मागवलेले समोसे आणि केक त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिल्याच्या कारणावरून हिमाचल प्रदेशात राजकारण तापले आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडीला करावी लागली आहे. राज्याच्या सीआयडी कार्यालयातच 15 दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आता समोर आली आहे.

हिमाचल प्रदेशात समोसा पॉलिटिक्स तापले आहे. सीआयडी चौकशी सुरू झाल्यानंतर पाच पोलिस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. सीआयडीकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Sukhvinder Singh Sukhu
Sadhvi Pragya Singh Thakur :'जिवंत राहिले तर...'; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा काँग्रेसवर गंभीर टॉर्चरचा आरोप!

सीआयडी कार्यालयात 21 ऑक्टोबरला ही घटन घडली आहे. सीआयडी कार्यालयातील सायबर विंग स्टेशनचे सुक्खू यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी एका हॉटेलमधून समोसे आणि केक आणण्यात आले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यावेळी अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

चौकशीमध्ये समोर आले की, आयजी रँकच्या एका अधिकाऱ्यांनी एका पोलिस उपनिरीक्षकाला मुख्यमंत्र्यांसाठी हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ आणण्यास सांगितले होते. या उपनिरीक्षकांनी पुढे सहायक आणि हेड कॉन्स्टेबलला पाठवले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पर्यटन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या नाश्त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनी समोसे मुख्यमंत्र्यांच्या मेन्यूमध्ये नसल्याचे सांगितले. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना समोसे आणि केक देण्यात आले.

Sukhvinder Singh Sukhu
Yasin Malik wife letter to Rahul Gandhi : काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या पत्नीने राहुल गांधींना पाठवले पत्र!

राजकारण तापले

भाजपने या प्रकरणावरून सुक्खू सरकारला धारेवर धरले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणधीर शर्मा म्हणाले, राज्य सरकारला विकासाची कुठलीही चिंता नाही. त्यांची चिंता केवळ मुख्यमंत्र्यांचा समोसा आहे. तपासामध्ये या घटनेला सरकारविरोधी म्हटले गेले आहे. हा शब्द खूप मोठा असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांशी संबंधित कार्यक्रमांबाबत अशाप्रकारच्या घटनांमुळे सरकारी यंत्रणेत समन्वय नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com