पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) सध्या सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpla Parrikar) यांना भाजपकडून तिकीट मिळणार की नाही. पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रीकर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र बाबूश मोन्सेरात (babush monserrate) या भाजपच्या विद्यमान आमदारांना डावलून उत्पल यांना तिकीट देण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे.
अशातच उत्पल यांच्या उमेदवारीबद्दल गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही हात झटकल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. फडणवीस म्हणाले होते, मनोहर पर्रीकरांनी गोव्यात भाजपला प्रस्थापित करण्यासाठी भरपूर काम केलेले आहे. मात्र, केवळ त्यांचा अथवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भाजपमध्ये तिकीट मिळत नाही. (Goa Assembly Election) त्यांचे कर्तृत्व असेल तरच त्यांचा विचार होतो. त्यामुळे याबाबतचा निर्णय मी घेऊ शकत नाही. पक्षाचे संसदीय मंडळ याबाबत निर्णय घेईल.
मात्र आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक वक्तव्य करत देवेंद्र फडणवीसांच्या याच भूमिकेवर कुरघोडी केल्याचे पाहायला मिळत आहे. आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी थेट उत्पल पर्रीकर (Goa Assembly Election) यांना निवडुण आणण्याची जबाबदारी घेतली आहे. यापुर्वीही राऊत यांनी उत्पल यांना शिवसेनेतुन निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर आता राऊत यांनी थेट उत्पल यांच्या विजयाचीच जबाबदारी शिवसेनेच्या खांद्यावर घेतली आहे.
संजय राऊत म्हणाले, दिवंगत मनोहर पर्रीकर फक्त गोव्याचेच नाही, तर देशाचे मोठे नेते होते. भाऊसाहेब बांदोडकरांनंतर गोव्यावर (Goa Assembly Election) प्रभाव असलेला एकमेव माणूस होता. आता त्यांच्या मृत्यूनंतर उत्पल राजकारणात येत आहे. पण भाजपकडून त्यांचा अपमान केला जात आहे. हि गोष्ट गोव्यातील लोकांना आवडलेली नाही. पण शेवटी पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. लढायचं असेल तर समोर या आम्ही त्यांच्यासोबत आहे, असेही त्यांनी उत्पल यांना आश्वासन दिले.
तसेच संजय राऊत म्हणाले, उत्पल पर्रीकर पणजीतुन निवडणुकीला (Goa Assembly Election) उभे राहिले तर गोव्यातील जनता त्यांच्या मागे उभी राहिलं. शिवसेनाही त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, इतकचं काय तर ते सांगितले ती मदत करु. आमच्यासोबत इतरही अनेक जण त्यांना मदत करतील. मनोहर पर्रीकर मोठे नेते होते, राजकारणापलिकडील व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणावर अन्याय होत असेल आणि ते धाडसाने पुढे येवून काही करणार असतील शिवसेना आणि इतर समाजही त्यांना मदत करेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.