Priyanka Chaturvedi : संसदेत सापडलेल्या नोटांच्या बंडल प्रकरणात शिवसेनेच्या चतुर्वेदींनी व्यक्त केली मोठी भीती...

ShivSenaUBT Priyanka Chaturvedi BJP currency notes Congress Abhishek Singhvi Rajya Sabha : काँग्रेस खासदार अभिषेक सिंघवी यांच्या राज्यसभा सभागृहातील आसनाखाली सापडलेल्या नोटांच्या बंडलावरून प्रियंका चतुर्वेदी यांचा भाजप सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
Priyanka Chaturvedi
Priyanka ChaturvediSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यसभा सभागृहात काँग्रेसचे खासदार अभिषेक सिंघवी यांच्या आसनाखाली नोटांचे बंडल सापडल्यावरून संसदेत राजकारण चांगलेच तापले आहे. या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

"आदानी यांच्या प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा हा खटाटोप सुरू आहे. आम्हा विरोधकांना अडकवण्यासाठी उद्या आमच्या आसनाखाली काहीही आणून ठेवतील", अशी गंभीर भीती प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप सत्ताधाऱ्यांविषयी व्यक्त केली.

प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "भाजप (BJP) सत्ताधारी संसदेच्या कामातून वेळ काढत आहेत. अदानींवर विचारलेल्या प्रश्नांतून पळ काढण्यासाठी बहाणेबाजी चालू आहेत. अदानी यांचे दलाल बनून भाजप काम करत आहे. लक्ष विचलीत करत आहे. पैसे रिकव्हर केले असतील, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु त्यात कोणाचे नाव घेणे, हे चुकीचे आहे". भाजप नेते केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी हा मुद्दा आणखी उचलून घेत चर्चेचा विषय असून, चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. हा खरच एवढा मोठा मुद्दा आहे, तर सीबीआय आणून चौकशी झाली पाहिजे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

Priyanka Chaturvedi
Abhishek Singhvi Net Worth : संसदेत सिंघवींच्या बाकाखाली सापडले नोटांचे बंडल; राज्यसभेत गोंधळ अन् चौकशीचा आदेश...पाहा VIDEO

"ससंदेत एखाद्या सदस्याच्या आसनाखाली नोटा सापडण्याचा हा प्रकार गंभीर आहे. विरोधक म्हणून आम्ही देखील चौकशीची मागणी करत आहोत. विरोधक म्हणून आमच्या खुर्चीखाली काहीही ठेवले जाऊ शकते. त्यातून आमच्यावर आरोप होऊ शकतात. कित्येक वेळा आम्ही खुर्चीवर बाजूला कोठेतरी असतो. सीसीटीव्ही तपासून नेमकं काय घडलं आहे, ते समोर आणलं पाहिजे. तसेच नाव घेण्यापूर्वी ही सर्व चौकशी व्हायला पाहिजे होती", असेही शिवसेनायुबीटी (Shivsena) पक्षाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले.

Priyanka Chaturvedi
Sukhbir Badal Shooting : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला, सुवर्णमंदिरात गोळीबार

संसदेचे हिवाळी अधिवेश सुरू आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून, उत्तरप्रदेशमधील दंगलीवरून, अदानी यांच्या अमेरिकेत झालेल्या आरोपांवरून आणि प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. यातच सभागृहातील आसन क्रमांक 222 मधून नोटांचे बंडल जप्त केल्याची माहिती राज्यसभा अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्याने, हे राजकीय वातावरण अधिकच तापले.

आसन क्रमांक 222 वर काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी बसत असल्याने त्यावरून भाजप सत्ताधाऱ्यांना आयता मुद्दा सापडला आणि भाजपने काँग्रेसला घेरले. यातून दोन्ही बाजूने खडाजंगी झाली. संपूर्ण चौकशी होईपर्यंत सत्ताधारी एखाद्याचे नाव कसे घेऊ शकतात, असा मुद्दा काँग्रेससह विरोधकांनी लावून धरला. यातच शिवसेनायुबीटी पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकाराबाबत गंभीर मुद्दा उपस्थित करून भाजप सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर आणि त्यांच्या संसदेतील कारवायांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com