Sanjay Singh, Jagdeep Dhankhar
Sanjay Singh, Jagdeep DhankharSarkarnama

Sanjay Singh News : तुरुंगातून निवडणूक जिंकूनही संजय सिंहांना खासदारकीची शपथ घेता येईना; कोर्टाकडून दुसऱ्यांदा परवानगी

Jagdeep Dhankhar : संजय सिंह यांच्याविरोधातील एक प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे धनखड यांनी शपथ देण्यास सोमवारी नकार दिला होता...
Published on

New Delhi : आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना ईडीने दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटक केली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी तुरूंगातून राज्यसभेची निवडणुकीचा अर्ज भरला होता. ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी त्यांना खासदारकीची शपथ घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. (Sanjay Singh News)

विशेष न्यायालयाने शपथ घेण्यासाठी संसदेत (Parliament) जाण्याची परवानगी संजय सिंह यांना दिली होती. त्यानुसार ते सोमवारी संसदेत दाखलही झाले. पण राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी शपथ देण्यास नकार दिला. संजय सिंह यांचे एक प्रकरण संसदेच्या विशेषाधिकारी समितीकडे प्रलंबित आहे. त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत सिंह यांना शपथ घेता येणार नाही, हे स्पष्ट आहे.

Sanjay Singh, Jagdeep Dhankhar
Lok Sabha Election 2024 : केसीआर यांना तीन दिवसांत दुसरा मोठा दणका; खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश  

न्यायालयाने पुन्हा एकदा संजय सिंह यांना शपथ घेण्यासाठी परवानगी दिली आहे. कोर्टाने जेल प्रशासनाला याबाबत आदेश दिले असून त्यांना ८ किंवा ९ फेब्रुवारीला थपथ घेण्यासाठी संसदेत नेण्यास परवानगी दिली आहे. सिंह यांना दुसऱ्यांदा ही परवानगी दिली आहे. पण त्यांना शपथ दिली जाणार का, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय सिंह यांना जुलै महिन्यात राज्यसभेतून (Rajya Sabha) अधिवेशनाच्या कालावधीपुरते निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना काही दिवसांत ईडीने मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली. त्याआधीच निलंबनाच्या कारावाईचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले होते. त्यावर विशेषाधिकार समिकीकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. हा निर्णय होऊन राज्यसभेत त्यावर शिक्कामोर्तब होईपर्यंत संजय सिंह यांना शपथ घेता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतून संजय सिंह यांच्यासोबत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या दोन नेत्यांना काही खासदारकीची शपथ देण्यात आली आहे. पण संजय सिंह यांच्या मार्गात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे आता विशेषाधिकार समिती कधी निर्णय घेणार, यावर त्यांच्या खासदारकीच भवितव्य अवलंबून असणार आहे.  

Sanjay Singh, Jagdeep Dhankhar
Maratha Reservation : आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेबाबत राहुल गांधींची मोठी घोषणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com