New Delhi : तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना तीन दिवसांत दुसरा मोठा धक्का बसला आहे. केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीचे नेते व माजी उपमुख्यमंत्र्यांनी रविवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर मंगळवारी काँग्रेसने केसीआर यांना दणका दिला. खासदाराने पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभेच्या तोंडावर केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Lok Sabha Election 2024)
तेलंगणातील (Telangana) पेडापल्ले मतदारसंघाचे खासदार बी. वेंकटेश नेटहा (B. Venkatesh Nehta) यांनी मंगळवारी काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंध रेड्डी यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेश झाला. वेंकटेश हे 2019 मध्ये पहिल्यांदाच खासदार झाले आहेत.
वेंकटेश यांचा 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. त्यांना लोकसभेचे तिकीटही मिळाले आणि विजयीही झाले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसचा हात धरला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही आहेत. राज्यात पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पहिला धक्का त्यांनी केसीआर (K. Chandrashekar Rao) यांना दिला आहे. बीआरएसचे आणखी काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री राजैह थाटीकोंडा (Rajaiah Thatikonda) यांनी केसीआर यांना पत्र पाठवून राजीनामा दिला आहे. थाटीकोंडा यांना मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. ते स्टेशन घाणपूर मतदारसंघाचे आमदार होते. तिकीट नाकारल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गुडघे टेकवून रडतानाचा त्यांचा व्हिडिओ त्यावेळी व्हायरल झाला होता.
सोनिया गांधी तेलंगणातून लढणार?
रेवंथ रेड्डी हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. लोकसभा निवडणूक तेलंगणातून लढण्याची विनंती त्यांनी सोनियांना केल्याचे समजते. तेलंगणा काँग्रेसने यापुर्वीच सोनिया गांधींनी तेलंगणातून लढावे, असा ठराव केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.