Satya Pal Malik Passed Away : मोठी दुःखद बातमी; माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

Former Governor Satya Pal Malik Passes Away in Delhi : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
Satya Pal Malik
Satya Pal MalikSarkarnama
Published on
Updated on

Satya Pal Malik death : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (वय 79) यांचं आज, मंगळवारी दिल्ली इथं दीर्घ आजारानं निधन झालं. आज मंगळवारी दुपारी एक वाजता नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सत्यपाल मलिक बऱ्याच दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना 11 मे रोजी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) राज्याचे ते शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द झाले. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि त्याचे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. विशेष म्हणजे, आज या निर्णयाचा सहावा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला.

सत्यपाल मलिक हे ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 पर्यंत बिहारचे (Bihar) राज्यपाल होते. 21 मार्च ते 28 मे 2018 पर्यंत त्यांच्याकडे राज्यपाल म्हणून ओडिशाचा अतिरिक्त कार्यभारही होता. जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांची गोव्याचे 18 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आले. त्यांनी ऑक्टोबर 2022पर्यंत मेघालयाचे 21 वे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले.

Satya Pal Malik
Balasaheb Thorat Bhojapur : थोरात यांचं विखेंना जशास तसं प्रत्युत्तर; इतिहास सांगताना, 'प्रवरे'च्या भूमिकेवर गौप्यस्फोट

सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसवाडा गावात एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ विद्यापीठातून विज्ञान पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. 1968-69 मध्ये, त्यांची मेरठ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, इथून पुढं त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात झाली होती.

राजकारणी म्हणून त्यांचा पहिला मोठा कार्यकाळ 1974-77 दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेचा सदस्य होते. 1980 ते 1986 आणि 1986-89 या काळात त्यांनी राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. 1989 ते 1991 या काळात ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलीगढमधून 9 व्या लोकसभेचे सदस्य होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com