Balasaheb Thorat Bhojapur : थोरात यांचं विखेंना जशास तसं प्रत्युत्तर; इतिहास सांगताना, 'प्रवरे'च्या भूमिकेवर गौप्यस्फोट

Sangamner Balasaheb Thorat Slams BJP Minister Radhakrishna Vikhe Patil Over Bhojapur Water Remarks : संगमनेरच्या भोजापूर चारीतील जलपूजनावरून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे.
Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Balasaheb Thoratsarkarnama
Published on
Updated on

Sangamner politics news : संगमनेरच्या भोजापूर चारीतील जलपूजनावरून भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय युद्ध चांगलच पेटलं आहे. मंत्री विखे यांनी, 'तुम्ही (बाळासाहेब थोरात) 40 वर्षे काही केले नाही, आता आमदार अमोल खताळला तरी काम करू द्या', असा टोला थोरात यांना लगावला होता.

थोरातांनी यावर जशास-तसं उत्तर दिलं आहे. चारीचा इतिहास मांडताना, ही चारी काय आठ महिन्यांमध्ये झाली का? या कामांमध्ये आपण एकतरी खडा कधी उचलला आहे का? असा टोला थोरातांनी लगावला आहे.

भाजप (BJP) मंत्री विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संगमनेरमधील भोजापूर चारीच्या पाण्यावरून राजकीय संघर्ष चांगलाच तापला आहे. मंत्री विखे पाटील यांच्या टीका थोरात यांनी भूलथापा असे म्हणत, लवकरच सर्वांची उत्तर देऊ, असा इशारा काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. आता श्रेयासाठी पुढे सरसावणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीला ही चारीसुद्धा माहिती नव्हती, असाही टोला थोरातांनी लगावला.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, "स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून, कारखान्याच्या मदतीने भोजापूर चारी तयार केली. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाला. त्यामुळे निसर्गाची कृषा झाली अन् पाणी आल्याचा आनंद झाला". मात्र या कामात तुमचे योगदान काय असा सवाल थोरातांनी मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांना उद्देशून केला आहे.

Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat
Top 10 News : भाजपचं गणित फिस्कटतंय, अजितदादांना खिंडीत गाठण्याचा, सुप्रिया सुळेंचं फडणवीसांना पत्र, वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

चारीचा इतिहास मांडताना थोरात म्हणाले, "1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यातून अंग काढून घेतलं. 1994 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने खर्च करून , 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा आणि कामगारांनी श्रमदानातून तिगाव माथ्यापर्यंत चारी पूर्ण करण्यात आली". 2 ऑक्टोबर 2006 मध्ये जलपूजन झाल्याचा मंत्री विखे पाटलांना विसर पडल्याचा टोलाही थोरातांनी लगावला.

Radhakrishna Vikhe Balasaheb Thorat
India US trade war : भारत-रशियाची मैत्री खटकतेय की अन् काही! डोनाल्ड ट्रम्प आणखी मोठा झटका देण्याच्या तयारीत...

'विखे पाटील 2008 मध्ये जलसंधारण मंत्री असताना चारीच्या दुरुस्तीसाठी, सेतू पुल, काँक्रीट कामे व लांबी करताना 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्तीकरिता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे कोणाचे योगदान आहे, हे जनतेला सर्व कळते', असेही थोरात यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com