
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राष्ट्रीय महामार्गावर साठ किलोमीटर अंतराच्या आत एकच टोलनाका ठेवण्याच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे देशभरातून स्वागत झाले आहे. ही घोषणा येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान रस्ते वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर आहे.
गडकरी यांनी लोकसभेत बोलताना याविषयीचे स्पष्टीकरण केले होते. राष्ट्रीय महामार्गावर टोलसाठी साठ किलोमीटर अंतराचे बंधन आहे. मात्र काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. गडकरी यांच्या घोषणेनंतर या अंतराच्या आत एकाहून अधिक असलेले टोलनाके आता बंद केले जातील.
हटविण्यात येणाऱ्या टोलनाक्यांना दिलेल्या कंत्राटाचा अभ्यास करून अधिकाऱ्यांना यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासाठी आता अधिकाऱ्यांची टिम कामी लागली आहे. हा नियम असतानाही काही ठिकाणी जादा टोलनाके असल्याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकाऱ्यांनी हे टोलनाके तीन महिन्यांच्या आत हलविण्याचे आदेश दिले. हे नियम 2008 मध्ये अस्तित्वात आले होते. त्या आधी आणि नंतरही असे टोलनाके असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर आता तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र आंतरराज्य सीमा ओलांडणाऱ्या रस्त्यांवरील टोलनाक्यांसाठी साठ किलोमीटर मर्यादेचा नियम लागू नसेल.
स्थानिकांना टोलमध्ये सूट देण्याबाबतही रस्ते मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. टोलनाक्यापासून पाच किलोमीटर अंतरावरच्या गावांना ही सूट लागू असेल. स्थानिकांच्या सोईसाठी महापालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग, पूल, बायपास किंवा टनेल बांधण्यात आला असेल तर त्यावेळी हा नियम लागू नसेल. या परिसरात टोल लागू शकतो. अर्थात यावर आणखी स्पष्टीकरण जारी केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.