गडकरी म्हणाले, फॉरेस्टवाले निकम्मे आहेत; तुम्ही नावे द्या, त्यांचा सीआर खराब करतो…

कार्यक्रमात गडकरींनी (Nitin Gadkari) मला नव्हे तर फॉरेस्टच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवा, निदर्शने करा, असा सल्ला दिला.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : भंडारा (Bhandara) ते पवनी या मार्गावरील ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम गेल्या ३ वर्षांपासून रखडले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ते काम अडवून ठेवले आहेत. हे फॉरेस्टवाले निकम्मे आहेत, तुम्ही त्यांची नावे द्या, त्यांची सीआर खराब करतो अन् त्यांच्यावर कठोर कारवाई करायला लावतो, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भंडाऱ्याच्या जनतेला आज सांगितले.

त्या रस्त्याचे काम रखडले असल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज नितीन गडकरींना (Nitin Gadkari) काळे झेंडे दाखवले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात गडकरींनी मला नव्हे तर फॉरेस्टच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवा, निदर्शने करा, असा सल्ला दिला. तुम्ही देखील केवळ चर्चा नका करू खासदार साहेब. कॉंग्रेसच्या (Congress) लोकांना घेऊन तुम्ही स्वतःदेखील तेथे जा, असे त्यांना भाजपचे (BJP) भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांना सांगितले. तरीही ते काम करत नसतील, तर अशा लोकांच्या विरोधात कायदा हातात घेण्यात काही गैर नाही, असे गडकरी म्हणाले. वनविभागाच्या विद्यमान सचिव यापूर्वी माझ्या विभागाच्या अतिरिक्त सचिव होत्या. त्यांना सांगून या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला लावतो, असेही गडकरी म्हणाले.

भंडाऱ्यातून जात असलेला मुंबई ते कोलकाता मार्ग असल्यामुळे येथे हेवी ट्रॅफीक आहे. सहा लेन रस्ता झाल्यावर भंडाऱ्याच्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मी नागपूरमार्गे अंभोऱ्याला आलो होतो. तेथे दर्शन केले, पुजा केली. येथे बांधण्यात येत असलेला पूल स्टेट ऑफ आर्ट असा हा पुल असणार आहे. क्रेनमधून मी वर गेला असता नद्यांचा संगम मला आज बघायला मिळाला. टुरीझम म्हणून हे स्थळ विकसीत करणार आहे. २०० लोक वर जातील अशा कॅप्सूल लिफ्ट असणार आहेत. गोसीखुर्दचे अभियंता माझ्यासोबत आज होते. त्यांना मी विनंती केली दोन टेकड्या जोडण्याची परवानगी दिली, तर रोप वे नक्कीच तयार करू. भंडारा आणि नागपूरला हवेतून जोडणारा रोप वे बांधण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

Nitin Gadkari
नितीन गडकरी म्हणाले; काळे झेंडे जरूर दाखवा, पण योग्य ठिकाणी...

वरती गेलो तेव्हा मला सांगितले की अंतर १३ किलोमीटर आहे आणि पाण्यातून गेलो तर फक्त १० किलोमीटर आहे. जर हे आपण करू शकलो, तर जागतिक पर्यटनाचं क्षेत्र बनेल. खासदार मेंढेंनी तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळविण्यासाठी येवढे करावेच, असे गडकरींनी सांगितले. मी पुलावर असताना दोन अभियंता मुली या पुलाच्या कामावर होत्या, त्यातील एक अंभोऱ्याची आहे, दुसरीपण त्याच परिसरातील आहे. दोघींनीही सिव्हिल इंजिनिअरिंग केले आहे. याच परिसरातील मुलींना पुलाच्या कामावर बघून मला आनंद झाला. अंभोऱ्याचा विकास करण्याचे नियोजन आम्ही केले आहे, हे जागतिक आकर्षणाचे केंद्र होईल, असे काम येथे करायचे आहे, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com