भाजपचा बडा नेता म्हणाला, आता पक्षाला रामराम!

भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. तथागत रॉय यांनी पक्षाला रामराम करण्याचे संकेत दिले आहेत.
Tathagat Roy and Narendra Modi
Tathagat Roy and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

कोलकता : भाजपमधील (BJP) मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते व मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय (Tathagata Roy) यांनी पक्षाला रामराम करण्याचे संकेत दिले आहेत. याचबरोबर पश्चिम बंगालमधील (West Bengal) भाजप नेतृत्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमधून बाहेर पडतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यापासून रॉय हे भाजपच्या नेतृत्वावर ताशेरे ओढत आहेत. त्यांनी पक्ष लवकरच सोडण्याचे संकेत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिले आहेत. मी भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालाची मी प्रतीक्षा करीत आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यातील भाजप नेत्यांवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

राज्यातील भाजप सुधारली नाही तर तिचे अस्तित्व संपून जाईल, असा इशारा रॉय यांनी नुकताच दिला होता. आज त्यांनी म्हटले आहे की, पक्षाला राज्यात नेमके काय सुरू आहे याची माहिती मिळावी, यासाठी मी हे करीत आहे. राज्यातील अनेक नेते हे बाई आणि पैशाच्या मागे लागले आहेत. आता मी महापालिका निवडणुकांची वाट पाहत आहे. हे निकालच राज्यातील भाजपच्या स्थितीबद्दल बोलतील. आता पश्चिम बंगाल भाजपला अलविदा!

Tathagat Roy and Narendra Modi
मोदींनी माघार घेतली अन् केंद्रीय मंत्र्यांनी त्यावर ओतलं पाणी!

राज्यात नुकत्याच झालेल्या चार विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपला धूळ चारली होती. चारही जागांवर तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवून भाजपला मोठा धक्का दिला होता. भाजपच्या चारपैकी तीन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपचे 2 आमदार कमी करुन आपले 4 आमदार वाढवले आहेत.

Tathagat Roy and Narendra Modi
मोठी घडामोड : तीन मंत्र्यांचे राजीनामे; उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार

पश्चिम बंगालमधील दिनहाटा, शांतीपूर, खरदा आणि गोसाबा या मतदारसंघात 30 ऑक्टोबरला मतदान झाले होते. राज्यात मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने भाजपचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममध्ये पराभव झाला होता. नंतर पारंपरिक भवानीपूर मतदारसंघातून पोटनिवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यानंतर काही दिवसांतच चार मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com