Digvijaya Singh: अडवाणींसोबत मोदींचा फोटो शेअर करत काँग्रेसच्या या दिग्गज नेत्यानं RSSचं केलं कौतुक; काँग्रेसमध्ये भूकंप!

Digvijaya Singh: या माजी मुख्यमंत्र्यानं काँग्रेसच्या भूमिकेविरोधात जाऊन हे भाष्य केल्यानं हा नेता चर्चेचा विषय ठरला आहे.
Advani Modi
Advani Modi
Published on
Updated on

Digvijaya Singh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या नरेंद्र मोदी यांचं आणि संघाचं काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं ट्विट करत कौतुक केलं आहे. भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे. या ट्विटमुळं काँग्रेसमध्ये मात्र भूकंप झाल्यासारखी स्थिती आहे. या माजी मुख्यमंत्र्यानं काँग्रेसच्या भूमिकेविरोधात जाऊन हे भाष्य केल्यानं हा नेता चर्चेचा विषय ठरला आहे.

Advani Modi
Nashik News: नाशिकमध्ये शिंदे सेनेची मोठी खेळी! छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गळाला

मोदी-अडवाणी फोटो पोस्ट

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका कार्यक्रमातला आहे, कदाचित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच एखाद्या शिबिरातला हा फोटो असावा. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी हे अगदीच तरुण वयातले दिसत आहेत. मोदी खाली जमिनीवर बसलेले असून त्यांच्या मागे अडवाणी आणि संघाचे इतर नेते खुर्चीमध्ये बसलेले आहेत.

Digvijay Singh
Digvijay Singh

नेमकं काय म्हटलंय?

या फोटोबाबत लिहिताना दिग्वीजय सिंह म्हणतात, "हा फोटो खूपच प्रभावशाली आहे. कारण ज्या प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि जनसंघाचा एक तळागळातला कार्यकर्ता जमिनीवर आपल्या नेत्यांच्या पायाशी बसून राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान बनला. ही या संघटनेची शक्ती आहे. जय सिया राम!" दिग्विजय सिंह यांनी अशा प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं असून त्याचा दाखला देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय संघर्षावरही भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे आपली ही पोस्ट दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय काँग्रेस, मध्य प्रदेश काँग्रेस, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, जयराम रमेश, नरेंद्र मोदी या सर्वांना टॅग केलं आहे.

Advani Modi
Nawab Malik: "नवाब मलिकांच्या पक्षाशी आमचा संबंध नाही" म्हणणाऱ्या भाजपला राष्ट्रवादीनं झडकारलं! मलिकांच्या कुटुंबातून ३ जणांना दिली उमेदवारी

सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा

दरम्यान, दिग्विजय सिंह यांच्या या ट्विटमुळं एकच खळबळ उडाली असून काँग्रेसमध्ये देखील भूकंपाचं वातावरण निर्माण झालं. यामुळं सकाळपासून दिग्विजय सिंह हे सोशल मीडियात चर्चेत आहेत. त्यांच्यावर उलटसुलट पद्धतीनं चर्चा सुरु आहेत. काही जणांनी दिग्विजय सिंह यांचं आकलन कमी असल्याचं म्हटलं आहे. कारण भाजपकडून मोदींना गुजरातमध्ये पुढे आणण्यात एका बड्या नेत्याला खाली थेटण्याचा भाग असल्याचं म्हटलं आहे.

तर आणखी एका युजरनं तुमचा पक्ष हा घराणेशाहीचं उदाहरण असून भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, अशा शब्दांत दिग्विजय सिंहांना सुनावलं आहे. तर आणखी एकानं दिग्विजय सिंह हे भाजपत जाण्याची तयारी करत आहेत का? की त्यांचं अकाऊंटच हॅक झालं आहे? असा सवाल केला आहे. तर आणखी एका युजरनं म्हटलं की, नंतर मोदींनी अडवाणींसारख्या ज्येष्ठ नेत्याचं महत्व कमी केलं पण काँग्रेसमध्ये आपल्या ज्येष्ठ नेत्याचं महत्व कमी करण्याची परंपरा नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com