Wrestler Protest : '' ब्रिजभूषण यांच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी पोलिसांना सात दिवस,पण..''; साक्षी मलिकचं संतप्त ट्विट

Sakshi Malik News : या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे का?
Sakshi Malik News, Wrestler Protest
Sakshi Malik News, Wrestler ProtestSarkarnama
Published on
Updated on

Wrestlers Protest : नव्या संसदेचं लोकार्पणाच्या दिवशीच दिल्लीतील कुस्तीपटूंचं आंदोलन चिघळलं आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंवर भररस्त्यात बळाचा वापर करत दिल्ली पोलिसांनी त्यांचं आंदोलन मोडीत काढलं. पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नव्या संसदेसमोर झटापट झाली. .

बॅरिकेट्स ओलांडून कुस्तीपटूंनी नवीन संसदेच्या दिशेनं कूच केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतलं. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिकनं संतप्त ट्विट केलं आहे.

Sakshi Malik News, Wrestler Protest
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; सी लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्रसेतू' नाव आणि...

नव्या संसदेसमोर महिला सन्मान महापंचायत आयोजित करण्याचा आंदोलक कुस्तीपटूंचा प्रयत्न होता. त्यासाठीच राजधानी दिल्लीत एकीकडे नव्या संसदेच्या उद्घाटनाचा सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे पोलीस आणि कुस्तीपटू यांच्यात झटापट झाली. यावेळी बळाचा वापर करत दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूं(Wrestler Protest)चं आंदोलन मोडीत काढलं. पोलिसांनी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन पोलिसांनी पूर्णपणे हटवलं आहे.

गेले 36 दिवस हे आंदोलन सुरू होतं. आंदोलक कुस्तीगीरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, यानंतरही कुस्तीपटूंनी सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे. तसेच भारतीय कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह(Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर ठाम असल्याचं कुस्तीपटू आणि आंदोलक साक्षी मलिकनं स्पष्ट केलं आहे.

Sakshi Malik News, Wrestler Protest
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी!

साक्षी मलिकनं संतप्त ट्विट

भाजप खासदार व भारतीय कुस्तीपटू कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंसह त्यांना समर्थन देणाऱ्या इतर कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनाच्या दिशेनं निषेध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांना अडवून त्यांची धरपकड करण्यात आली. रात्री उशिरा आंदोलक कुस्तीपटूंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आंदोलक महिला कुस्तीपटू साक्षी मलिकनं संतप्त ट्विट केलं आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलंय ?

दरम्यान, रात्री गुन्हा दाखल होताच आंदोलक कुस्तीपटू साक्षी मलिक(Sakshi Malik)नं संतप्त सवाल करणारं ट्विट केलं आहे. “दिल्ली पोलिसांना लैंगिक शोषण करणाऱ्या बृजभूषण सिंह यांच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी सात दिवस लागतात. पण शांततेत आंदोलन करण्यासाठी आमच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी सात तासही लागले नाहीत. या देशात हुकुमशाही सुरू झाली आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करत इथलं सरकार कशाप्रकारे आपल्या खेळाडूंशी वागतंय, हे अवघं जग बघतंय असंही साक्षीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Sakshi Malik News, Wrestler Protest
Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंचं आंदोलन पोलिसांकडून चिरडण्याचा प्रयत्न; महिला आयोगाने संतप्त होत थेट..

गुन्हा दाखल

दिल्ली पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा (दि.२८) जंतरमंतरवर घडलेल्या गोंधळप्रकरणी आंदोलक कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलं १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३ आणि पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या हवाल्यानं एएनआयनं दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com